पुलवामा : जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात मंगळवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. एका दहशतवाद्याची ओळख पटली आहे. काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्या हत्येत त्याचा सहभाग होता आणि तो पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना 'द रेझिस्टन्स फ्रंट' (TRF) साठी काम करत होता. काश्मीरच्या एडीजीपीच्या म्हणण्यानुसार, ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आकिब मुस्ताक भट असे आहे. त्याने सुरुवातीला हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम केले. आजकाल तो टीआरएफमध्ये काम करत होता. काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्या हत्येत त्याचा सहभाग होता.
या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद : अवंतीपोरा चकमकीत पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ते शहीद झाले. मिळालेल्या माहितीनुसार, 92 बेस हॉस्पिटलमध्ये जवानाचा मृत्यू झाला. याआधी रविवारी आणखी एका टार्गेट किलिंगमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांच्यावर गोळीबार केला. पुलवामा जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठेत जात असताना ही घटना घडली. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर सुरक्षा दल परिसरात सक्रिय झाले आणि त्यांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली.
-
J&K | An encounter broke out between terrorists and security forces in Awantipora. One terrorist was killed in the encounter.
— ANI (@ANI) February 28, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/PifDpmsPOV
">J&K | An encounter broke out between terrorists and security forces in Awantipora. One terrorist was killed in the encounter.
— ANI (@ANI) February 28, 2023
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/PifDpmsPOVJ&K | An encounter broke out between terrorists and security forces in Awantipora. One terrorist was killed in the encounter.
— ANI (@ANI) February 28, 2023
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/PifDpmsPOV
शोध मोहीम सुरू केली : काश्मीर झोनच्या पोलीस अधिकाऱ्याने ट्विट करून माहिती दिली की, पुलवामा जिल्ह्यातील पदगामपोरा अवंतीपोरा येथे चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. चकमक सुरू आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पडगामपोरा अवंतीपोरा भागात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.
दोन्ही पक्षांमध्ये चकमक : सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या लपण्याच्या दिशेने जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलांनी प्रत्युत्तर दिले. अशातच दोन्ही पक्षांमध्ये चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंच्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला. या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. यामध्ये एक जवान शहीद झाला. या भागात आणखी दहशतवादी अडकले आहेत की नाही याची माहिती नाही. सध्या सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध घेत आहेत.
हेही वाचा : Kashmiri Pandit Murder : काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या; पुलवामातील अचन गावात हत्येचा निषेध