ETV Bharat / bharat

दक्षिण भारताला बसणार 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा तडाखा; सरकार अलर्टवर, NDRF तैनात - राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल

Michaung Cyclone : दक्षिण भारतातील तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी या राज्यांना मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

Michaung Cyclone
Michaung Cyclone
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 10:23 PM IST

Updated : Dec 4, 2023, 10:31 PM IST

नवी दिल्ली Michaung Cyclone : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्र्यांकडून मिचॉन्ग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. गृहमंत्र्यांनी राज्यांना केंद्राकडून सर्व आवश्यक मदतीचं आश्वासन दिलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या जवानांची पुरेशी तैनाती करण्यात आली असून अतिरिक्त पथकं आणखी मदतीसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • Union Home Minister Amit Shah spoke to Tamil Nadu CM MK Stalin and Puducherry CM N. Rangasamy and took stock of the measures taken to tackle the challenging weather conditions caused by Cyclone 'Michaung'.

    "Assured them of all the necessary assistance from the Modi Government… pic.twitter.com/UF2aJZqvRt

    — ANI (@ANI) December 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Union Home Minister Amit Shah had a discussion with the Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy about the preparations concerning the potential landfall of Cyclone 'Michaung'.

    "Saving the lives of citizens has been our priority. The central govt is braced to provide all the… pic.twitter.com/7ZoEs0dXj3

एनडीआरएफची तैनाती : चक्रीवादळाच्या तयारीबाबत गृहमंत्र्यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. 'नागरिकांचं प्राण वाचवणं ही आमची प्राथमिकता असल्याचं ते म्हणाले. "केंद्र सरकार आंध्र प्रदेशला आवश्यक ती सर्व मदत देण्यास तयार आहे. एनडीआरएफ आधीच तैनात करण्यात आलं असून, आवश्यकतेनुसार आणखी टीम तयार ठेवण्यात आल्या आहेत", असं त्यांनी स्पष्ट केलं. आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या दक्षिण भागात घिरट्या घालणाऱ्या 'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. चक्रीवादळ हळूहळू तीव्र होऊन उत्तरेकडे आंध्र प्रदेशच्या किनार्‍याजवळ सरकण्याची शक्यता आहे. ते नेल्लोर आणि मछलीपट्टणममधील बापटलाजवळून जाईल.

चेन्नईत मुसळधार पाऊस : सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत चक्रीवादळ ताशी आठ किमी वेगानं उत्तर-पश्चिम दिशेला सरकलं. ते दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीच्या क्षेत्रावर केंद्रित झालं. यामुळे सोमवारी दिवसभर चेन्नईत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून, वीज आणि इंटरनेट सेवा खंडित झाली होती. मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. याशिवाय अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरही प्रभाव पडला होता.

आंध्र प्रदेशात मुसळधार पावसाचा इशारा : या चक्रीवादळामुळे ताशी १००-१०० किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत आंध्र प्रदेशातील काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. संततधार पावसामुळे तिरुमला तिरुपती देवस्थाननं श्री कपिलतीर्थम धबधब्यावर पवित्र स्नान करण्यास भक्तांना तात्पुरती मनाई केली आहे.

हेही वाचा :

  1. मिचॉन्ग चक्रीवादळामुळे चेन्नईत पावसाचं थैमान, ७० उड्डाणं रद्द

Last Updated : Dec 4, 2023, 10:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.