नवी दिल्ली - केंद्रीय गृह मंत्रालयाने मुश्ताक अहमद जरगरला बेकायदेशीर कारवायांसाठी दहशतवादी घोषीत केले आहे. (Mushtaq Ahmed Zargar as a terrorist) तो अल-उमर मुजाहिदीन संघटनेचा संस्थापक आणि कमांडर आहे. (1999)मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमान अपहरणात प्रकरणात सोडण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी जरगर हा एक आहे.
गृहमंत्रालयाने एका अधिसूचनेत ही माहिती दिली - जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या मुश्ताक अहमद जरगरला केंद्र सरकारने दहशतवादी घोषीत केले आहे. (1999)मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या (IC-814)विमानाच्या अपहरणानंतर सोडण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये जरगरचाही समावेश होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने एका अधिसूचनेत ही माहिती दिली आहे.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटशीही संलग्न - गेल्या आठवडाभरात केंद्र सरकारने दहशतवादी घोषीत केलेली ही चौथी व्यक्ती आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 52 वर्षीय जरगर उर्फ लतराम हा श्रीनगरमधील नौहट्टा येथील आहे. तो अल-उमर-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आणि मुख्य कमांडर आहे. तो जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटशीही संलग्न आहे. जरगर सध्या पाकिस्तानात आहे. तो पाकिस्तानात शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेला होता.
दहशतवादाला वित्तपुरवठा करण्याचे काम - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी जरगर पाकिस्तानच्या वतीने सतत मोहीम राबवत असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.हत्या, खुनाचा प्रयत्न, अपहरण, नियोजन, दहशतवादी हल्ले घडवणे आणि दहशतवादाला वित्तपुरवठा करणे यासह विविध दहशतवादी कृत्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे - जरगर हा केवळ भारतासाठीच नाही तर जागतिक शांततेसाठी धोका आहे. कारण तो अल-कायदा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या कट्टरपंथी दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे. जरगर उर्फ लतरामच्या दहशतवादात सहभाग असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे. सरकारने दहशतवादी घोषीत केलेला तो ३५वा व्यक्ती आहे."बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा, (1967)च्या कलम (35)च्या उप-कलम (1) च्या खंड (अ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, केंद्र सरकारने याद्वारे या व्यक्तीला चौथ्या अनुसूचीमध्ये ठेवले आहे.
दहशतवादी घोषीत करण्यात आले आहे - यापूर्वी 8 एप्रिल रोजी सरकारने लष्कर-ए-तैयबाचा नेता आणि (26/11)मुंबई दहशतवादी हल्ल्याचा 'मास्टरमाइंड' हाफिज सईदचा मुलगा हाफिज तलहा सईद यालाही दहशतवादी घोषीत केले होते. यानंतर (2019)मध्ये जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी नागरिक मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर याला (11 एप्रिल)रोजी दहशतवादी घोषीत करण्यात आले आहे.
चौथ्या अनुसूचीमध्ये टाकण्याचा अधिकार देतो - यासोबतच (2016)मध्ये पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला पाकिस्तानी अली काशिफ जान याला सरकारने (12 एप्रिल)रोजी दहशतवादी घोषीत केले होते. हा कायदा केंद्र सरकारला दहशतवादात कोणी सामील आहे असे वाटत असल्यास त्याचे नाव कायद्याच्या चौथ्या अनुसूचीमध्ये टाकण्याचा अधिकार देतो.
हेही वाचा - Russia Ukraine War 51Th Day : रशियन युद्धनौकेवर हल्ला केल्याचा युक्रेनचा दावा