ETV Bharat / bharat

Reservation In CISF : गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, माजी अग्निवीरांना सीआयएसएफमध्ये मिळणार १० टक्के आरक्षण - माजी अग्निवीरांना सीआयएसएफ मध्ये आरक्षण

माजी अग्निवीरांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील रिक्त पदांवर आरक्षण मिळाले आहे. गृह मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. मंत्रालयाने आठवड्यापूर्वी सीमा सुरक्षा दलात देखील अग्निवीरांसाठी आरक्षण जाहीर केले होते.

agniveer
अग्निवीर
author img

By

Published : Mar 17, 2023, 10:17 AM IST

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधील रिक्त पदांवर माजी अग्निवीरांसाठी 10 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या सोबतच मंत्रालयाने उच्च वयोमर्यादेत देखील शिथिलता दिली आहे. ही सूट हे अग्निवीर पहिल्या बॅचचे आहेत की त्यानंतरच्या बॅचचे भाग आहेत यावर अवलंबून असणार आहे.

10 टक्के रिक्त पदे माजी कर्मचार्‍यांसाठी राखीव : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा, 1968, (1968 चा 50) अंतर्गत केलेल्या नियमांमध्ये सुधारणा केल्यानंतर अधिसूचनेद्वारे ही घोषणा करण्यात आली आहे. अधिसूचनेत नमूद केले आहे की, 10 टक्के रिक्त पदे माजी कर्मचार्‍यांसाठी राखीव असतील. यावर मंत्रालयाने सांगितले की, माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांनी आणि इतर बॅचच्या उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल केली जाणार आहे.

शारीरिक कार्यक्षमता चाचणीतूनही सूट : माजी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीतूनही सूट देण्यात येईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलात 17 ते साडे 21 वयोगटातील तरुणांची भरती करण्यासाठी केंद्राने गेल्या वर्षी 14 जून रोजी महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजना सुरू केली होती. योजनेंतर्गत भरती झालेल्यांना अग्निवीर म्हणून ओळखले जाणार आहे. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक बॅचमधील 25 टक्के अग्निवीरांना नियमित सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.

उच्च वयोमर्यादा शिथिल केली : केंद्रीय निमलष्करी दल आणि आसाम रायफल्समधील 10 टक्के रिक्त पदे 75 टक्के अग्निवीरांसाठी राखीव असतील, असे गृह मंत्रालयाने त्यावेळी सांगितले होते. आता माजी अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादा पाच वर्षांनी आणि त्यानंतरच्या तुकडींसाठी तीन वर्षांनी शिथिल करण्यात आली आहे. याशिवाय, माजी अग्निवीरांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीतूनही सूट दिली जाणार आहे.

अग्निपथद्वारे तरुणांना लष्करात संधी : गेल्या वर्षी 14 जूनला केंद्र सरकारने लष्कर, नौदल आणि हवाई दलातील सैनिकांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना जाहीर केली होती. या योजनेद्वारे तरुणांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सेवेचे संधी मिळते. चार वर्षांनंतर 25 टक्के जवानांना 15 वर्षांच्या कालावधीसाठी संबंधित सेवेत कायम ठेवण्यात येणार आहे. विरोधी पक्षांनी जरी या योजनेवर टीका केली असली तरी ही योजना सशस्त्र दलांना अधिक तगडी बनवेल आणि त्यांच्या सध्याच्या गरजा पूर्ण करेल, अशी भूमिका सरकारने मांडली आहे.

हे ही वाचा : Cold Storage Accident In Sambhal : कोल्ड स्टोरेजचे छत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू, 11 जणांना वाचवण्यात यश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.