नवी दिल्ली - खासदार सुप्रिया सुळे यांनी पीएमएलएच्या प्रकरणात थेट अटक करण्यात ( Supriya Sule on PMPLA ) येत आहे. त्यावरून प्रश्न उपस्थित केला. क्रिप्टोकरन्सी हे देशासाठी चांगले नाही. तर त्यावर कारवाई करण्यात येत का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
क्रिप्टोकरन्सी हे डार्क वेबमध्ये सुरू ( MP Supriya Sule on Cryptocurrency ) आहे. त्यामुळे अनेकांचे आयुष्य उद्वस्त होत आहेत. त्यामुळे त्यावर पूर्णपणे बंदी लागू करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे ( demand on ban cryptocurrency ) यांनी केली. क्रिप्टोकरन्सीची सरकारकडे व आरबीआयकडे कोणतीही आकडेवारी नाही. क्रिप्टोकरन्सीला परवानगी दिली नाही. मात्र, कर लागू करण्यात येत आहे, त्याबाबतही खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा-प्रताप सरनाइक यांची 11 करोडची संपत्ती ईडी ने केली जप्त
खासदार श्रीकांत शिंदे यांनी सरकारवर केली टीका
खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, की कर वसुलीसाठी इतके अधिकार प्राप्तिकर अधिकाऱ्यांना का दिले आहेत? त्यामागे विरोधी पक्षांना टार्गेट करण्याचा उद्देश आहे का? अधिकाऱ्यांनाच देवासारखे अधिकार दिले आहेत. इज ऑफ डुईंग ऐवजी इज ऑफ क्लोझिंग होत आहे.