ETV Bharat / bharat

Weather In Maharashtra : महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत उष्णतेची लाट; हवामान खात्याची माहिती - heat wave from Maharashtra to Odisha

महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत तसेच पश्चिम बंगालपासून राजस्थानपर्यंत पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान खात्याने (IMD)ने दिला आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात दोन ते चार अंशांची वाढ होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे. ( Weather In Maharashtra ) तसेच, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 28 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Weather In Maharashtra
Weather In Maharashtra
author img

By

Published : Apr 27, 2022, 11:25 AM IST

मुंबई - महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत तसेच पश्चिम बंगालपासून राजस्थानपर्यंत पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान खात्याने (IMD)ने दिला आहे. ( Today Weather In Maharashtra ) महाराष्ट्राच्या काही भागांत कमाल तापमानात दोन ते चार अंशांची वाढ होईल असाही अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात 28 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट धडकेल - आयएमडीने मंगळवारी जाहीर केलेल्या बुलेटीननुसार, पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ होणार आहे. वायव्य हिंदुस्थानात 2 ते 3 अंश, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात 2 ते 4 अंशांची वाढ होऊ शकते. तसेच, राजस्थानच्या पूर्व आणि पश्चिम भागांत शुक्रवारपर्यंत उष्णतेची लाट धडकेल, असा इशारा आयएमडीने दिला आहे.

किनारपट्टी भागात 37 अंश - कमाल तापमानाची पातळी जर सखल भागात 40 अंश, किनारपट्टी भागात 37 अंश आणि डोंगराळ भागात 30 अंशांच्या पुढे गेली तर त्या स्थितीला उष्णतेची लाट मानली जाते. पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत या लाटेचा प्रभाव दिसेल, असे आयएमडीने म्हटले आहे.

हेही वाचा - Sunil Jakhar : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचे निलंबन होणार?

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.