सॅन फ्रान्सिस्को : मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी फॉलोअर्ससोबत सरळ संपर्कात राहण्यासाठी नव्या फिचरची घोषणा केली आहे. हे नवीन फिचर फेसबुक आणि मॅसेंजरवर लवकरच सुरू होणार असल्याचे मार्क झुकेरबर्ग यांनी आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. फॉलोअर्सशी सरळ संपर्कात राहण्यासाठी आता फेसबुक, इंस्टाग्राम आणि मॅसेंजरवर ब्राडकास्ट चॅनेल सुरू होणार असल्याने चाहत्यांशी थेट संपर्क करता येणार आहे.
आता मिळणार विविध सुविधा : आगामी काही महिन्यांमध्ये इंस्टाग्राम, फेसबुक आणि मॅसेंजरवर अनेक सुविधा मिळणार आहेत. सध्या इंस्टाग्राम किवा फेसबुकवर संदेश पाठवणाऱ्यांने संदेश पाठवल्यास त्याचे चाहते किवा फॉलोअर्स संदेशाला प्रतिक्रिया देऊ शकतात. मात्र आगामी काही दिवसात ब्रॉडकास्ट चॅनेल सुरू झाल्यास त्यावर आणखी काही वैशिष्टे जोडली जाणार आहेत. त्यानुसार चॅनेलच्या माध्यमातून आणखी काही निर्माते आणले जाऊ शकतात. किवा क्राऊडसोर्स प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यासह अनेक फिचर या माध्यमातून फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मिळणार असल्याचे कंपनीने आपल्या ब्लॉगस्पॉटवर नमूद केले आहे.
स्टोरीमध्ये स्टीकरचा उपयोग करता येणार : फेसबुक, इंस्टाग्राम आणि मॅसेंजरवर ब्राडकास्ट चॅनेल सुरू झाल्यानंतर त्या माध्यमातून स्टोरी या स्टोरीचा क्रिएटर याबाबतचा मॅसेज आपल्या फॉलोअर्सला देईल. मॅसेज मिळाल्यानंतर त्या क्रिएटरचे फॉलोअर्स त्या चॅनलमध्ये सहभागी होऊन क्रिएटरच्या सूचना ऐकतील. यावेळी लाखो फॉलोअर्सला आपल्या प्रतिक्रिया किवा सूचना एकाचवेली मिळतील. त्यामुळे या ब्रॉडकास्ट चॅनेलचे अनेक फायदे स्टोरी क्रिएटरला मिळतील. फॉलोअर्सला देखील या चॅनेलमधील सूचनावर नियंत्रण मिळवता येणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. स्टोरी क्रिएटरला स्टोरीत चांगले स्टिकर वापरुन शकतात, अशी सुविधाही या चॅनेलमध्ये देण्यात आली आहे.
सध्या यूएसमध्ये सुरू आहे चाचणी : सोशल नेटवर्कींग साईटवर मेटा चॅनेलच्या माध्यमातून मार्क झुकेरबर्ग यांनी याबाबत विविध माहिती दिली आहे. ब्रॉडकास्ट चॅनेलच्यामाध्यमातून अनेक मॅसेजींग टुल्स क्रिएटरला आपल्या फॉलोअर्ससोबत जोडून ठेवण्याचे काम करेल असी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. याबाबतचे काम यूएसमधील काही क्रिएटरला घेऊन केले जात असल्याचेही कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या ब्रॉडकास्ट चॅनेलचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Twitter Offices Closed In India : एलन मस्कने भारतातील तीनपैकी दोन ट्विटरचे कार्यालय गुंडाळले, जाणून घ्या काय आहे कारण