श्रीनगर: पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी राष्ट्रपती पदावरून पायउतार होताच रामनाथ कोविंद यांच्यावर टिप्पणी केली. रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी संपला. आज द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, कोविंद यांनी एक असा वारसा निर्माण केला आहे की, जिथे भारतीय संविधानाला अनेकदा चिरडले गेले.
-
The outgoing President leaves behind a legacy where the Indian Constitution was trampled upon umpteenth times. Be it scrapping of Article 370,CAA or the unabashed targeting of minorities & Dalits, he fulfilled BJPs political agenda all at the cost of the Indian Constitution.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The outgoing President leaves behind a legacy where the Indian Constitution was trampled upon umpteenth times. Be it scrapping of Article 370,CAA or the unabashed targeting of minorities & Dalits, he fulfilled BJPs political agenda all at the cost of the Indian Constitution.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) July 25, 2022The outgoing President leaves behind a legacy where the Indian Constitution was trampled upon umpteenth times. Be it scrapping of Article 370,CAA or the unabashed targeting of minorities & Dalits, he fulfilled BJPs political agenda all at the cost of the Indian Constitution.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) July 25, 2022
मेहबूबा मुफ्ती यांनी सोशल मीडिया ट्विटरवर म्हटले आहे की, 'रामनाथ कोविंद यांनी एक असा वारसा निर्माण केला आहे जिथे भारतीय संविधान पंधरावेळा चिरडले गेले. कलम 370 रद्द करणे असो, CAA असो किंवा अल्पसंख्याक आणि दलितांना बेधडकपणे लक्ष्य करणे असो, त्यांनी भारतीय संविधानाच्या किंमतीवर भाजपचा राजकीय अजेंडा पूर्ण केला.
दुसरीकडे द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांनी आज (सोमवार) देशाच्या १५व्या राष्ट्रपती ( President ) म्हणून शपथ घेतली. त्या देशातील पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती आहेत. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या आणि राष्ट्रपतीपदावर विराजमान झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी द्रौपदी मुर्मू यांना मंत्रिपदाची शपथ दिली. माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद ( Former President Ramnath Kovind ), उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ( Vice President Venkaiah Naidu ), पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) आणि इतर अनेक ज्येष्ठ नेते आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.