ETV Bharat / bharat

मेघालयात बस अपघातात ६ प्रवासी ठार, २१ थोडक्यात बचावले - मेघालय बस अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील इस्ट गारो हिल्स येथील नॉन्गसरम पुलाजवळ हा अपघात झाला. अपघाता झाला तेव्हा बस अत्यंत वेगाने जात होती, असे जखमी प्रवाशांनी सांगितले आहे.

मेघालय बस अपघात
मेघालय बस अपघात
author img

By

Published : Sep 30, 2021, 1:34 PM IST

नॉन्गचरम (मेघालय)- येथून जवळ असलेल्या नदीत बस कोसळल्याने ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण २१ प्रवासी होते. काल (बुधवार) मध्यरात्री १२ च्या सुमारास ही बस रिंगडी नदीत कोसळली.

आतापर्यंत चार मृतदेह नदीबाहेर काढण्यात आले आहेत. दोन मृतदेह अद्यापही नदीत अडकून पडले आहेत. १६ प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले असून जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट खासी हिल्स जिल्ह्यातील इस्ट गारो हिल्स येथील नॉन्गसरम पुलाजवळ हा अपघात झाला. अपघाता झाला तेव्हा बस अत्यंत वेगाने जात होती, असे जखमी प्रवाशांनी सांगितले आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रोन्गजेंग आणि विल्यमनगर येथील अग्नीशमन दलाचे आणि इतर जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच बचावकार्य राबविल्याने मोठा अनर्थ टळला आहे. इतर प्रवाशांना सुरक्षित बसबाहेर काढता आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.