ETV Bharat / bharat

मायावतींची वाढदिवसाच्या दिवशी मोठी घोषणा! लोकसभेच्या 'या' फॉर्म्युलाची केली घोषणा - लोकसभा निवडणूक 2024

BSP Supremo Mayawati Birthday: बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष (बीएसपी) मायावती यांनी त्यांचा आज सोमवार (15 जानेवारी)रोजी 68 वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत.

Mayawati
मायावती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 15, 2024, 2:19 PM IST

लखनऊ : BSP Supremo Mayawati Birthday: बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज आपल्या वाढदिवसाला पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकी 2024 संदर्भात मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याही पक्षासोबत न जाता बहुजन समाज पक्ष एकटा निवडणूक लढेल अशी घोषणा मायावती यांनी आज केली. राज्यातील चारवेळा विधानसभेत यश मिळाले होते. त्या काळात मोठं काम झालं अशी आठवणही त्यांनी सांगितली. तसेच, ज्यावेळी इतर पक्षांसोबत युती केली जाते तेव्हा-तेव्हा बसपाचेचं नुकसान झालं आहे, असंही मायावती यावेळी म्हणाल्यात. इतर पक्षाच्या सरकारने विकासाबाबत बसपाची नक्कल केली आहे, असा दावाही बसपा अध्यक्षांनी केला.

अखिलेश यादव गिरगिट : काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षांची विचारसरणी जातीयवादी आहे. सध्या वंचित, दलित आणि बेरोजगार घटकांसाठी बसपा सत्तेमध्ये येण आवश्यक आहे. तसंच, या जातीवादी विचारसरणीच्या विरोधी पक्षांना दूर ठेवायला हवं असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावरही त्यांनी यावेळी भाष्य केलंय. इंडिया आघाडीत जावून अखिलेश यादव यांनी जे वक्तव्य केल आहे, ते रंग बदणाऱ्या गिरगीटासारख आहे, असा खोचक टोलाही मायावती यांनी लागावलाय.

पाठिंबा मोफत मिळणार नाही : बसपाला युतीचा फायदा कमी आणि तोटा जास्त झाला आहे. तसेच, हेराफेरीमुळे आमच्या पक्षाचं अधिक नुकसान होते असा दावा बसपा अध्यक्षांनी केला. सवर्णांची मते बसपाकडे हस्तांतरित होत नाहीत. त्यामुळे बसपा कोणाशीही युती करणार नाही. योग्य भागीदारी मिळाल्यास निवडणुकीनंतर पाठिंबा दिला जाऊ शकतो. अशी शक्यता वर्तवताना मायावती यांनी हा पाठिंबा मोफत मिळणार नाही. तर योग्य सन्मान झाला पाहीजे असंही त्यांनी यावेळी सांगितलय.

योजनांची कॉपी केली : मायावतींनी भाजपा सरकारवर हल्लाबोल करताना, मोफत रेशनमध्ये लोकांची फसवणूक झाल्याचा आरोप मायावती यांनी केला. रेशन देऊन त्यांना गुलाम बनवले जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केलाय. उत्तर प्रदेशात आमच्या चार वेळा सरकार असताना आम्ही सर्व घटकांसाठी काम केले आहे. अल्पसंख्याक, मुस्लिम, गरीब, शेतकरी, कष्टकरी लोकांसाठी लोककल्याणकारी योजना राबवल्या. सरकारे या योजनांची नावे आणि स्वरूप बदलून त्यांच्या स्वत:च्या बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही युपीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.

हेही वाचा :

1 काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा दिवस; आज नागालँडमध्ये करणार मुक्काम

2 'पैसे देऊन बलात्कार सुरू, राज्यातील उत्तम गोष्टी हिसकावण्याचा प्रयत्न'; जमीन परिषदेत राज ठाकरे संतप्त

3 ईडीला घाबरुन पळालेल्या पळपुट्या मुख्यमंत्र्यांना आम्ही गांभीर्यानं घेत नाही-संजय राऊतांची सडकून टीक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.