ETV Bharat / bharat

Maulana Taukir Raza on PM : पंतप्रधान धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर आले नाही तर देशात महाभारत घडेल- आयएमसीचे राष्ट्रीय अध्यक्ष - loudspeakers during Namaz

बरेलीमध्ये मौलाना तौकीर रझा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ( Maulana Taukir Raza praised Yogi Adityanath ) वक्तव्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य कौतुकास्पद आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करायला हवे. यामुळे आपल्या यूपीचे वातावरण चांगले राहील. नमाजाच्या वेळी ( loudspeakers during Namaz ) लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा वाजवण्याबाबत मौलाना तौकीर रझा ( Hanuman Chalisa controversy ) म्हणाले की, हनुमान चालसी वाचा, गायत्री मंत्राचा पाठ करा किंवा पूजा करा.

मौलाना तौकीर रझा
मौलाना तौकीर रझा
author img

By

Published : Apr 21, 2022, 10:20 PM IST

बरेली ( उत्तर प्रदेश ) - आयएमसीचे राष्ट्रीय अध्यक्ष ( IMC slammed PM ) मौलाना तौकीर रझा यांनी केंद्रातील भाजप सरकारवर एकतर्फी कारवाईचा आरोप केला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धृतराष्ट्र असे संबोधत कठोर टीका केली आहे. तौकीर म्हणाले की, पंतप्रधानांनी डोळे आणि कान उघडले नाहीत तर महाभारत घडू शकते. दिल्लीत जेलभरो आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.

बरेलीमध्ये मौलाना तौकीर रझा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ( Maulana Taukir Raza praised Yogi Adityanath ) वक्तव्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य कौतुकास्पद आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक करायला हवे. यामुळे आपल्या यूपीचे वातावरण चांगले राहील. नमाजाच्या वेळी ( loudspeakers during Namaz ) लाऊडस्पीकरवरून हनुमान चालीसा वाजवण्याबाबत मौलाना तौकीर रझा ( Hanuman Chalisa controversy ) म्हणाले की, हनुमान चालसी वाचा, गायत्री मंत्राचा पाठ करा किंवा पूजा करा. यात काही हरकत नाही. पण इतर धर्मीयांचा छळ करण्यासाठी अशा प्रकारचे काम केले जात असेल. तर त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.

पंतप्रधान धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर आले नाही तर देशात महाभारत घडेल

तौकीर रझा म्हणाले की, शांततेसाठी जर कोणी हनुमान चालीसा वाचत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. पण नमाजच्या वेळी इतरांच्या अजानमध्ये अडथळा आणण्यासाठी इतरांना दुखावण्याचे काम त्याने करावे हा त्याचा हेतू आहे. असे केल्याने हनुमान हे सुखी होतील का? अशा लोकांविरुद्ध आवाज उठवणे ही आपली जबाबदारी आहे. जेणेकरून देशातील वातावरण बिघडणार नाही.

आरोप करणे आणि आरोप सिद्ध होणे यात फरक - दुसरीकडे, दिल्लीतील दंगलीनंतर बुलडोझरच्या कारवाईवर मौलाना तौकीर रझा यांनी कोणत्याही एका राज्याचे किंवा जिल्ह्याचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, की जर कोणी गुन्हा केला असेल, तर जागेवरच निर्णय घेतला जात आहे. एखाद्यावर आरोप करणे आणि आरोप सिद्ध होणे यात फरक आहे. आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणे हा अन्याय आहे. बुलडोझर चालवलेल्या घरातील बाकीच्या सदस्यांचा काय दोष होता?

पंतप्रधानांचे मौन योग्य नाही- असाच अन्याय होत राहिला तर देशव्यापी जेलभरो आंदोलन थांबवणे सरकारला कठीण जाईल, असा इशारा मौलाना तौकीर रझा यांनी दिला. ज्या दिवशी मुस्लिम रस्त्यावर येतील, त्या दिवशी ते कोणाच्याही नियंत्रणाखाली येणार नाहीत. हे समजून घेतले पाहिजे. हा मी सरकारला इशारा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत मौलाना तौकीर रझा म्हणाले की, विशेषत: मी पंतप्रधानांना सावध करू इच्छितो की त्यांची कार्यपद्धती ठीक नाही. त्यांचे मौन योग्य नाही. तुमच्या देशात एवढा अप्रामाणिकपणा सुरू असतानाही तुम्ही मूकपणे पाहत आहात. जर नरेंद्र मोदी हे धृतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर आले नाहीत, तर भारतात महाभारत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.

मौलाना तौकीर रझा यांनी केंद्र सरकारवर एकतर्फी कारवाई केली आहे. सरकारचे असेच सुरू राहिल्यास येत्या ईदनंतर दिल्लीत देशव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात येईल, असे आयएमसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना तौकीर रझा सांगितले.

हेही वाचा-Share Market Today : शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्सची 421 तर निफ्टीमध्ये 98 अंकांची उसळी

हेही वाचा-Social Harmony in Karnatak : सहा वर्षाच्या मुलीचा रोजानिमित्त उपवास; हिंदू कुटुंबाने आरती करून केले कौतुक

हेही वाचा-UK PM Visit Sabarmati : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे गुजरातमध्ये जंगी स्वागत; साबरमती आश्रमात दिली भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.