चंडीगढ - पंजाब हरियाणा हायकोर्ट शनिवारी एका याचिकेच्या सुनावणीवर निर्णय देताना म्हटले की, मुस्लिम मुलगी हिंदू मुलाचे लग्न धर्मांतर केल्याशिवाय कायदेशीर दृष्ट्या वैध ठरू शकत नाही. उच्च न्यायालयाने हे सुद्धा स्पष्ट केले की, दोघेही सज्ञान पाहिजेत त्याचबरोबर न्यायालयाने म्हटले आहे, की असे जोडपे विवाहासारखे लिव इन रिलेशनशिपमध्ये राहू शकतात.
याचिका दाखल करताना प्रेमी युगुलाने उच्च न्यायालयाला सांगितले की, मुस्लिम मुलीचे वय १८ वर्ष तर हिंदू मुलाचे वय २५ वर्ष आहे. दोघांनी हिंदू रीति-रिवाजानुसार १५ जानेवारी रोजी शिव मंदिरात लग्न केले होते. विवाह केल्यानंतर दोघांच्या जीवाला त्यांच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याचे सांगितले जात आहे. आपल्या संरक्षणासाठी याचिकाकर्त्यांनी अंबालाच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर प्रेमी युगुलाने उच्च न्यायालयाचा दरवाजा खटखटला.
हे ही वाचा - पुन्हा एकदा खोट्या प्रकरणात अडकवल्याचा सचिन वझेंचा दावा; व्हाट्सअॅप स्टेटसमधून व्यक्त केला मृत्यूचा विचार?
हायकोर्टाने सांगितले की, मुस्लिम मुलीचा हिंदू मुलासोबत विवाह कायदेशीररित्या वैध नाही. हायकोर्टाने म्हटले की, जोपर्यंत मुलगी हिंदू धर्म स्वीकारून रीति-रिवाजानुसार विवाह करत नाही तोपर्यंत हे लग्न अवैध मानले जाईल.
मुलीने मुस्लिम धर्माचा त्याग केलेला नाही. त्यामुळे या विवाहाला हिंदू विवाह अधिनियमानुसार वैध मानले जाऊ शकत नाही. दरम्यान हायकोर्टाने स्पष्ट केले आहे, की दोनों सज्ञान आहेत व विवाह वैध नसला तरी ते पती-पत्नीप्रमाणे सहमतीने संबंध ठेऊ शकतात.