ETV Bharat / bharat

Boat Capsizing In Giridih : बोट उलटून आठ जण बेपत्ता, झारखंडच्या गिरीडीहमधील दुर्घटना

झारखंडमधील गिरिडीहमध्ये बोट उलटून झालेल्या अपघातात ( boat capsizing in Giridih ) त्यात 8 जण बेपत्ता ( Eight People Missing ) झाले आहेत. धनवार ब्लॉकमधील गोरहंद आणि कोडरमाच्या मार्कच्या सीमेवर असलेल्या पंचखारो धरणात ही दुर्घटना घडली. प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

author img

By

Published : Jul 17, 2022, 2:47 PM IST

बोट उलटून आठ जण बेपत्ता
बोट उलटून आठ जण बेपत्ता

गिरीडीह - गिरीडीह जिल्ह्यात झालेल्या या अपघातातील बोटमध्ये 10 जण होते. यातील दोनजण पोहून बाहेर आले, परंतु आठजण बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. ही घटना धन्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडली आहे. धनवार ब्लॉकमधील गोरहंद आणि कोडरमाच्या सीमेवर असलेल्या पंचखारो धरणात एका छोट्या बोटीतून 10 जण प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान बोट उलटली ( boat capsizing in Giridih ). त्यामुळे बोटीवरील 8 जण धरणात बुडाले आहेत.

बेपत्ता लोकांचा शोध - या घटनेची माहिती मिळताच धरणाजवळ नागरिकांची गर्दी झाली. घटनास्थळी प्रशासनाचे पथक बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे. बुडालेले सर्वजण धन्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. धन्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी नागेंद्र कुमार घटनास्थळी पोहोचले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. एनडीआरएफशीही संपर्क साधण्यात आला आहे. हजारीबाग येथून एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

हेही वाचा - Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.