ETV Bharat / bharat

Gas leak in Nangal : लुधियानानंतर आता नांगलमध्ये गॅस गळतीने हाहाकार, लहान मुलांसह अनेकांना उलट्यांचा त्रास

पंजाबमधील नांगल शहरात गॅस गळतीमुळे नागरिकांमध्ये हाहाकार उडाला आहे. पीएसीएल कारखान्यातून गॅस गळती झाल्यामुळे नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास झाल्याने खळबळ उडाली आहे.

Gas leak in Nangal
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 11, 2023, 2:54 PM IST

चंदीगड : पंजाबमधील लुधियानानंतर आता नांगलमधून गॅस गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील पीएसीएल कारखान्यातून गॅस गळती होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाला आहे. बाधितांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून सध्या खबरदारी घेतली जात आहे. याबाबतची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री हरजोत बैंस यांनी घटनेचा आढावा घेतला आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन करत घाबरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

नांगलमधील शाळांना सुट्टी : नांगल गॅस गळतीमुळे खासगी शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक प्रभावित झाले आहेत. या परिसरातील काही मुले आणि शिक्षकांनी उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर गॅस गळती झाल्याचे आढळून आले. प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून शाळेला सुटी देण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. उपायुक्त प्रीती यादव घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी घटनेचा आढावा घेतला आहे.

जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात : नांगलमध्ये गॅस गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांनी एकच धावपळ झाली. त्यामुळे खबरदारी लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री हरजोत बैंस यांनी घटनेचा आढावा घेतला. कोणालाही घाबरण्याची गरज नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परिसरातील सर्व रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, ही वायू गळती कशी झाली याबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने माहिती दिली नाही.

हेही वाचा -

The Kerala Story : राजधानी दिल्लीत द केरळ स्टोरी चित्रपट करा करमुक्त; विश्व हिंदू परिषदेचे अरविंद केजरीवालांना पत्र

Maharashtra Political Crisis : सत्ता की पुन्हा संघर्ष आज होणार फैसला, राज्यपालांची कृती ठरणार घटनाबाह्य; जाणून घ्या काय म्हणाले घटनातज्ज्ञ

Former Pakistan Minister Arrested : इमरान खान पाठोपाठ पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री मखदूम शाह महमूद कुरैशीही अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.