पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Manohar Parrikars son Utpal Parrikar) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी पणजीतील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विजयाची खूण दाखवीत आपल्या समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले.
पणजी- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची धामधूम सुरू झाली. वाढदिवसाच्या निमित्ताने आज सकाळी उत्पल पर्रीकर यांनी पणजीत महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पक्षाच्या आदेशानेच निवडणूक लढविणार (Utpal Parrikar on 2022 assembly election) असल्याचे सांगितले. गरज पडल्यास कठीण संघर्ष करण्यास मागे हटणार नसल्याचे सांगितले.
हेही वाचा-मनोहर पर्रिकरांचा वारसा पुत्र उत्पल चालविणार; आमदार बाबुश मोन्सरातांकडून भाजपला सूचक इशारा
विधानसभा निवडणूक लढविणार
उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) म्हणाले, की आयुष्यात मनोहर पर्रीकर यांना कोणतीही गोष्ट सहजपणे मिळाली नाही. त्यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यातूनच ते सर्वोच्च पदावर पोहोचले. वेळ पडल्यास आपणही असा संघर्ष करून पक्षाच्या आदेशानुसार विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
हेही वाचा-मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण हा गोव्यासाठी प्रेरणादायी- डॉ. प्रमोद सावंत
कार्यकर्त्यांसोबत शक्तिप्रदर्शन-
वाढदिवसाच्या निमित्ताने उत्पल यांनी महालक्ष्मी मंदिरात दर्शन (Panji Mahalaxmi temple) घेऊन दिवसाची सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. यावेळी त्यांनी विजयाची खूण करत आगामी विधानसभा निवडणुकीत (goa 2022 assembly election)पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
हेही वाचा-भाऊसाहेब बांदोडकर, मनोहर पर्रीकर यांची दूरदृष्टी घेऊन 'आप' काम करणार - मनिष सिसोदिया
मनोहर पर्रिकरांचा उत्पल सांभाळणार वारसा
अनेक वर्षांपासून मनोहर पर्रीकर हे राजधानी पणजी मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते. आमदार, विरोधी पक्षनेते ते राज्यात भाजपचे पाहिले मुख्यमंत्री असा त्यांचा याच मतदारसंघातून प्रवास झाला. याच मतदारसंघात त्यांना मानणारा आणि अर्थातच त्यांना मनोहर भाई ही उपाधीही देणारा मतदार आहे. मनोहर पर्रिकरांमुळेच वर्षानुवर्षे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे 2022 च्या निवडणुकीत पर्रीकर यांच्या नावाचा उपयोग न करता निवडणूक लढविण्याचे आदेश पक्षाने उत्पल पर्रीकर यांना दिले आहेत.