नवी दिल्ली : पंतप्रधान नरेद्र मोदी (PM Modi Mann Ki Baat) यांनी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मन की बात(Man Ki Baat) या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतात. या वेळच्या मन की बातमध्ये बोलताना देशाच्या अमृत महोत्सवाचा गाजावाजा पंचायतीपासून ते संसदेपर्यंत राहील असे मोदी म्हणाले.
शूरवीरांचे स्मरण
डिसेंबर महीण्यात नेव्ही डे(Navy Day) तसेच आर्म फोर्स फ्लॅग डे (Armed Forces Flag Day) साजरा करण्यात येतो. 16 डिसेंबर रोजी देश 1971 च्या युध्दाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने मी देशातील शूरवीरांचे स्मरण करतो. त्यांनी सांगितले की, साजरा होणारा अमृत महोत्सव आपल्याला शिकण्यासोबतच देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारा आहे. आता देशात सर्वसामान्य लोक असोत किंवा सगळे सरकार, पंचायतीपासून ते संसदेपर्यंत अमृत महोत्सवाचा गाजावाजा आहे. या महोत्सवाशी संबंधित कार्यक्रमाची मालिका सुरू आहे.
त्यांनी सांगितलेकी, देश जनजातीय गौरव सप्ताह पण साजरा करत आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात याचे कार्यक्रम झाले. अंदमान-निकोबार द्वीप समूहावर पण जनजातीय समुदायांनी आपल्या संस्कृतीचे जिवंत प्रदर्शन केले. काही दिवसांपूर्वी दिल्लीत आझादी की कहानी-बच्चोंकी जुबानी कार्यक्रमात लहान मुलांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची गाथा सादर केली. यात विशेष बाब ही होती की यात भारतासह नेपाळ, माॅरिशस, टांझानिया, न्यूझीलंड आणि फिजी या देशांतील विद्यार्थी सहभागी झाले होते. 24 आक्टोबर रोजी प्रसारीत झालेल्या मन की बात कार्यक्रमात मोदींनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यावर भर दिला होता.
मराठमोळ्या मयूरचे कौतुक
पंतप्रधान मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात मराठमोळ्या मयूर पाटील या तरूणाचे कौतुक केले. तसेच त्याच्याशी संवादही साधला. मयूरने गाड्यांचे मायलेज वाढविणारे उपकरण तयार केले असून त्याचे स्टार्टअप पण सुरू केले आहे त्याची स्माॅल स्पार्क कन्सेप्ट ( Small Spark Concepts ) नावाची कंपनी आहे. या संवादाच्या वेळी मयूरने सांगीतले की, माझ्याकडे असलेल्या गाडीचे मायलेज वाढावे तसेच धूर कमी निघावा यासाठी मी प्रयत्न केला. आणि तो यशस्वी झाला. आम्हाला त्याचे पेटंट मिळाले आता भारत सरकारच्या मदतीने आम्ही कंपनी सुरू केली आहे.