इंफाळ : मणिपूरमधील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये तणाव कायम आहे. दरम्यान, राहुल गांधी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आज मोइरांगमध्ये पोहोचले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कीशम मेघचंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी मदत छावण्यांना भेट देतील आणि तेथील बाधित लोकांची भेट घेणार आहेत. यासोबतच ते 10 समविचारी पक्षाचे नेते आणि नागरी संस्थांच्या सदस्यांचीही भेट घेणार आहेत. शांतता ही एकमेव प्राथमिकता असायला हवी, असे राहुल गांधी यांनी यापूर्वी एका ट्विटमध्ये म्हटले होते.
-
#UPDATE | Congress leader Rahul Gandhi has landed in Moirang and is meeting the affected people in relief camps. #Manipur https://t.co/xY224cVb0F
— ANI (@ANI) June 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE | Congress leader Rahul Gandhi has landed in Moirang and is meeting the affected people in relief camps. #Manipur https://t.co/xY224cVb0F
— ANI (@ANI) June 30, 2023#UPDATE | Congress leader Rahul Gandhi has landed in Moirang and is meeting the affected people in relief camps. #Manipur https://t.co/xY224cVb0F
— ANI (@ANI) June 30, 2023
,
आसामच्या मुख्यमंत्र्यांचा निशाणा : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, हिंसाचाराच्या काळात राहुल गांधींचा मणिपूर दौरा म्हणजे माध्यमांमधील प्रचाराशिवाय दुसरे काही नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिपूरमधील दुःखद परिस्थितीतून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही सरमा म्हणाले. राहुल गांधी यांच्या एकदिवसीय दौऱ्याने परिसरात काहीही बदल होणार नाही, असे ते म्हणाले.
मणिपूरमध्ये तणाव - 3 मे रोजी मणिपूरमधील कुकी समुदायाच्या लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. त्याला त्यांनी आदिवासी एकता मार्च असे नाव दिले. चर्चंदपूर येथे रॅली काढण्यात आली. मेईतेई समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी कुकी समाजाच्या लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. या रॅलीला बिगर आदिवासींनी विरोध केला. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता. आताही मणिपूरमधील काही भागांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
-
#WATCH | Imphal | Manipur Congress president Keisham Meghachandra says, "..Rahul Gandhi is leaving for Moirang. He will meet all the affected families & visit the relief camps. After that, he will be back in Imphal. At Imphal Hotel he will meet civil society organisation leaders,… pic.twitter.com/Pe6yX9OXfa
— ANI (@ANI) June 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Imphal | Manipur Congress president Keisham Meghachandra says, "..Rahul Gandhi is leaving for Moirang. He will meet all the affected families & visit the relief camps. After that, he will be back in Imphal. At Imphal Hotel he will meet civil society organisation leaders,… pic.twitter.com/Pe6yX9OXfa
— ANI (@ANI) June 30, 2023#WATCH | Imphal | Manipur Congress president Keisham Meghachandra says, "..Rahul Gandhi is leaving for Moirang. He will meet all the affected families & visit the relief camps. After that, he will be back in Imphal. At Imphal Hotel he will meet civil society organisation leaders,… pic.twitter.com/Pe6yX9OXfa
— ANI (@ANI) June 30, 2023
राहुल गांधींचा अडवला होता ताफा - राहुल गांधी गुरुवारी दुपारी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर पोहोचले होते. राहुल गांधी यांनी मणिपूरमधील इंफाळ येथील एका मदत शिबिराला भेट दिली. तसेच तेथे राहणाऱ्या कुटुंबांची भेट घेतली. तिथे त्यांचा ताफा अडवण्यात आल्याने ते पुढील दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले होते.
हेही वाचा -