ETV Bharat / bharat

Manipur Violence : विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ मणिपूरमधील हिंसाचारग्रस्त भागांचा करणार दौरा

मणिपूर हिंसाचार मुद्दा सध्या देशात गाजत आहे. यावरून विरोधी पक्षांनी संसदेर गदारोळ केला आहे. मात्र, आता येत्या 29 आणि 30 जुलैला विरोधी पक्षांचे अर्धात 'इंडिया'चे एक शिष्टमंडळ मणिपूरला भेट देणार आहे. तसेच तेथील परिस्थितीचा आढावा हे शिष्टमंडळ घेणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jul 27, 2023, 3:21 PM IST

नवी दिल्ली - मणिपूर हिंसाचार मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. आता विरोधकांचे एक शिष्टमंडळ मणिपूरला भेट देणार असल्याचे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्सने जाहीर केले आहे. 29 आणि 30 जुलैला 'इंडिया'तील घटक पक्षांच्या खासदारांचे एक शिष्टमंडळ हिंसाचारग्रस्त मणिपूरला भेट देणार आहे.

विरोधी पक्षांच्या २० हून अधिक खासदारांचे शिष्टमंडळ या आठवड्याच्या शेवटी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरला भेट देणार आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकताच मणिपूरचा दौरा केला होता - मणिकम टागोर, लोकसभा प्रतोद, काँग्रेस

सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव - मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेत सध्या गदारोळ सुरू आहे. तसेच काँग्रेसने बुधवारी लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी मंजूर करण्यात आला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून या प्रस्तावावर चर्चेची तारीख ठरवणार आहेत.

मणिपूरमध्ये घडलेला सर्व विषय सर्वांसमोर आहे. त्यामुळे त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. विरोधकांना पाहिजे तोपर्यंत मणिपूर विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे - अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

सरकार चर्चेसाठी तयार - मणिपूर हिंसाचार मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. या मुद्द्यावर सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिले होते. तसेच याबाबत चर्चेसाठी राज्यसभा आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेते यांना अमित शाह यांनी पत्रदेखील लिहिले होते. मात्र, त्यानंतरही विरोधक संसदेत आक्रमक होताना दिसून येत आहेत.

लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ - बुधवारी मणिपूरच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांकडून प्रचंड गदारोळ करण्यात आला. दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी मणिपूर हिंसाचारावरुन विरोध सुरू केला. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारपर्यंत तहकूब करण्यात आले होते. मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधक सातत्याने पंतप्रधानांना सभागृहातच निवेदन देण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा -

  1. Narendra Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून गुजरात दौऱ्यावर, राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे करणार उद्घाटन
  2. Monsoon Session 2023 : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ब्लॅक डे'; मणिपूर हिंसाचाराच्या निषेधासाठी 'इंडिया'चे खासदार काळे कपडे घालून संसदेत दाखल!
  3. Parliament Monsoon Session 2023 : ठाकरे गटाच्या खासदारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, लोकसभा-राज्यसभा तहकूब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.