ETV Bharat / bharat

Manipur CM : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे फाडलेले राजीनामा पत्र व्हायरल, समर्थक अडवून म्हणाले.. - मणिपूरचे मुख्यमंत्री राजीनामा

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. मात्र आता सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचे राजीनामा पत्र व्हायरल होत आहे.

N BIREN SINGH
एन बीरेन सिंह
author img

By

Published : Jun 30, 2023, 4:04 PM IST

Updated : Jun 30, 2023, 6:02 PM IST

इंफाळ : हिंसाचारग्रस्त राज्य मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे सांगितले आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. तत्पूर्वी आज दिवसभर एन बिरेन सिंह आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा होती. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत.

  • At this crucial juncture, I wish to clarify that I will not be resigning from the post of Chief Minister.

    — N.Biren Singh (@NBirenSingh) June 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राजीनामा पत्र व्हायरल : आता सोशल मीडियावर एक राजीनामा पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे लिहिले आहे. मात्र हे राजीनामा पत्र फाडलेले आहे. एन बिरेन सिंह यांना ते राजीनामा देण्यासाठी इंफाळमधील गव्हर्नर हाऊसमध्ये जात असताना त्यांच्या समर्थकांनी अडवले होते.

  • PHOTO | Supporters of Manipur CM N Biren Singh stop him from meeting Governor and tender his resignation. pic.twitter.com/dNj1PupOog

    — Press Trust of India (@PTI_News) June 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिरेन सिंह यांनी राजीनामा न देण्याची मागणी : मणिपूरचे मुख्यमंत्री सचिवालय आणि राजभवनपासून सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या नुपीलाल कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी शेकडो महिला जमल्या. त्यांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा देऊ नये असे आवाहन केले. महिला नेत्या क्षेत्रीमायुम शांती म्हणाल्या की, 'या गंभीर काळात बिरेन सिंह सरकारने खंबीरपणे उभे राहून आंदोलकांवर कारवाई केली पाहिजे.'

मणिपूरमध्ये दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू : मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जातीय हिंसाचार सुरू आहे. 3 मे रोजी येथे हिंसाचार सुरू झाला. जवळपास दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारमुळे 50 हजारांहून अधिक लोक आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. वेगवेगळ्या घटनांमध्ये आत्तापर्यंत 100 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. मणिपूरमध्ये कुकी समाज आणि मैतेई समाजामध्ये हा संघर्ष सुरु आहे.

राहुल गांधी मणिपूरच्या दौऱ्यावर : यावरून विरोधक राज्य सरकारवर सातत्याने दबाव आणत आहेत. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. त्यांनी राज्यातील हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेतली. या सोबतच त्यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचीही चर्चा आहे. राहुल गांधी यांनी मोइरांग शहरातील दोन मदत शिबिरांना भेट दिली. त्यांनी सकाळी हेलिकॉप्टरने मोइरांग येथे पोहोचून बाधितांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, राहुल यांनी भेट दिलेल्या दोन कॅम्पमध्ये सुमारे 1000 लोक राहतात.

काय आहे प्रकरण : राज्यातील मैतेई समाजाला अनुसूचीत जमातीचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरुद्ध कुकी समाजाच्या लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. या रॅली दरम्यान दोन्ही बाजूंमध्ये जोरदार हाणामारी झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. तेव्हापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. आंदोलकांनी केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह यांचे घर देखील जाळले आहे.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi Manipur Visit : मणिपूर दौऱयाचा राहुल गांधींचा दुसरा दिवस; मदत शिबिरांना भेट
  2. Manipur Violence : मणिपूरमधील समस्या धार्मिक नाही, दंगल गैरसमजातून झाली - केंद्रीय मंत्री राजकुमार रंजन सिंह
  3. Himanta Biswa Ram Madhav : मणिपूरमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी जहालवाद्यांची मदत घेतली?, हेमंता बिस्वा, राम माधव यांच्यावर गंभीर आरोप

Last Updated : Jun 30, 2023, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.