हैदराबाद - मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी हेगिंग मतदारसंघातून निवडणूक लढवत काँग्रेसचे शरतचंद्र सिंह यांचा 18,000 मतांनी पराभव केला आहे. आम्ही लवकरच सरकार स्थापन करू असे मत विजयानंतर व्यक्त केले आहे. आता एन बिरेन सिंह मुख्यमंत्री होतात का याकडे देशाचे लक्ष आहे.
-
#ManipurElections2022 | I have prayed to God, that the coming five years would be tantamount to the last 5 years with peace and development and that BJP forms government with full majority: Manipur CM N Biren Singh
— ANI (@ANI) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
BJP leading on 3 seats with an Independent leading on 1 seat: EC pic.twitter.com/zvTUg7tbk2
">#ManipurElections2022 | I have prayed to God, that the coming five years would be tantamount to the last 5 years with peace and development and that BJP forms government with full majority: Manipur CM N Biren Singh
— ANI (@ANI) March 10, 2022
BJP leading on 3 seats with an Independent leading on 1 seat: EC pic.twitter.com/zvTUg7tbk2#ManipurElections2022 | I have prayed to God, that the coming five years would be tantamount to the last 5 years with peace and development and that BJP forms government with full majority: Manipur CM N Biren Singh
— ANI (@ANI) March 10, 2022
BJP leading on 3 seats with an Independent leading on 1 seat: EC pic.twitter.com/zvTUg7tbk2
मी देवाला प्रार्थना करतो की, आगामी पाच वर्षे शांतता आणि विकासाची असतील. आणि भाजप संपूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असे मत मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह व्यक्त केले आहे.
भाजपा काँग्रेसमध्ये निकराची लढत
मणिपूर विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहण्यास मिळत आहे. सकाळी आठपासून सुरू झालेल्या मतमोजणीत पहिल्यापासून भाजपाच आघाडीवर राहिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बिरेन सिंह यांची सत्ता येण्याची शक्यता दिसत आहे. त्यांच्या कारकीर्दीत प्रथमच भाजपा सत्तेत आला आहे.
2002 मध्ये केली कारकीर्दीला सुरूवात
एन. बिरेन सिंग यांनी 2002 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी काँग्रेसचा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 1 जानेवारी 1961 रोजी जन्मलेल्या एन. बिरेन सिंग यांनी अल्पावधीतच आपल्या राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. पत्रकार असण्यासोबत ते एक उत्तम फुटबॉलपटू होते. यामुळे ते सीमा सुरक्षा दलात दाखल झाले.
हेही वाचा - Five States Elections Result : पाच राज्यांच्या निकालाची उत्सुकता... जाणून घ्या, मतमोजणीपूर्वीची स्थिती