ETV Bharat / bharat

NSA Ajit Doval : अजित डोभाल यांच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसण्याचा प्रयत्न! घातपाताचा कट? - अजित डोभाल यांच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसखोरी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल ( Man tries to enter NSA Ajit Doval's residence ) यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी तातडीनं घरात घुसणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे.

अजित डोभाल
Man tries to enter NSA Ajit Doval's residence
author img

By

Published : Feb 16, 2022, 1:23 PM IST

नवी दिल्ली - देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या निवासस्थानी ( Man tries to enter NSA Ajit Doval's residence ) एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला रोखले आणि ताब्यात घेतले. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या एका सूत्राने ही माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार तो मानसिक आजारी आहे आणि भाड्याने गाडी चालवत होता. ही व्यक्ती बंगल्यात कुठल्यातरी षड्यंत्राखाली किंवा चुकून घुसली, याबद्दल दिल्ली पोलिसांचा विशेष कक्ष त्याची चौकशी करणार आहे.

संबंधित व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी आपल्या शरीरात कोणीतरी चिप बसवली असून आपल्याला नियंत्रित केले जात असल्याचा दावा त्याने केला. मात्र, असे काही नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक तपासात तो मानसिक आजारी असल्याचे समजते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा त्याला पकडले, तेव्हा तो माणूस थोडा बडबडत होता. वृत्तानुसार, तो कर्नाटकातील बंगळुरूचा रहिवासी आहे. दहशतवादविरोधी युनिट आणि पोलिसांच्या स्पेशल सेलकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याला ताब्यात घेऊन लोधी कॉलनीतील स्पेशल सेलच्या कार्यालयात आणण्यात आले असून येथे चौकशी सुरू आहे.

कोण आहेत अजित डोभाल?

अजित डोभाल?हे १९६८ च्या केरळ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नियुक्तीच्या ४ वर्षानंतर १९७२ साली त्यांची गुप्तचर खात्यात निवड करण्यात आली होती. ते देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. डोभाल हे मोदींच्या मागील कार्यकाळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी म्हणून त्यांनी काम बजावले. बालाकोट एअर स्ट्राईक आणि २०१६ साली सर्जिकल स्ट्राईक मोहीम डोभाल यांच्या नेतृत्वातच पार पडली होती. डोभाल यांची गणना जगातील सर्वाधिक प्रभावशाली अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.

हेही वाचा - SCO meet पाकमधील दहशतवाद संघटनांविरोधात अजित दोवालांची कठोर भूमिका, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.