ETV Bharat / bharat

Bihar Man Took 11 Vaccine : बिहारच्या ब्रम्हदेवांनी कोरोना लसीचे एक, दोन नव्हे तर घेतले चक्क अकरा डोस

बिहारमधील मधेपुरा येथील एका 84 वर्षीय वयोवृद्धाने असा दावा केला आहे की त्याने एक दोन वेळा नाहीत तर 11 वेळा कोरोना लसीकरण ( Elderly Got 11 Doses Of Corona Vaccine In Madhepura ) केला आहे. वाचा सविस्तर...

bihar Man took 11 Vaccine
कोरोना लसीचे 11 डोस घेतले
author img

By

Published : Jan 6, 2022, 2:27 PM IST

Updated : Jan 6, 2022, 2:58 PM IST

मधेपुरा - बिहारमधील मधेपुरा येथील एका 84 वर्षीय वयोवृद्धाने असा दावा केला आहे की त्याने एक दोन वेळा नाहीत तर 11 वेळा कोरोना लसीकरण ( Elderly Got 11 Doses Of Corona Vaccine In Madhepura ) केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना लसीकरणाचा फायदा झाला आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा-पुन्हा लसीचे डोस घेतले. तर काही दिवसापूर्वी तो लस घेण्यासाठी चौसा पीएससी केंद्रावर गेला होता. मात्र लसीकरण बंद झाल्यामुळे त्याला 12 वा लसीचा डोस घेता आला नाही.

कोरोना लसीचे 11 डोस घेतले

11 वेळा घेतले लसीचे डोस -

ब्रह्मदेव मंडल यांचे आधार कार्डवर वय 84 वर्ष आहे. ते पोस्ट विभागात काम करत होते. आता ते सेवानिवृत्त असून गावाकडे राहतात. त्यांच्या माहितीनुसार, त्यांनी पहिला लसीचा डोस हा 13 फेब्रुवारी 2021 ला घेतला होता. तेव्हापासून 30 डिसेंबर 2021 पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 11 डोस घेतले आहेत. मंडल यांनी लसीचा डोस घेतलेली माहिती संपूर्ण सविस्तर एका कागदावर लिहिलेली आहे.

ब्रम्हदेव यांनी केव्हा केव्हा घेतली लस -

13 फेब्रुवारी रोजी ब्रम्हदेव यांनी पहिला डोस हा जुन्या पीएससी मध्ये घेतला होता. दुसरा डोस 13 मार्च रोजी तेथेच घेतला होता. तर तिसरा डोस हा 19 मेला औराय उप आरोग्य केंद्रावर घेतला होता. तर चौथा डोस हा त्यांनी 16 जून रोजी भुपेंद्र भगत येथील कोटा कॅम्पमध्ये घेतला होता. पाचवी लस ही 24 जुलैला जुन्या हॉट स्कुलमध्ये झालेल्या कॅम्पमध्ये घेतली होती. तर सहावी लस 31 ऑगस्टला नाथबाबा येथील कॅम्पमध्ये आणि सातवी लस ही 11 सप्टेंबरला जुन्या हॉट स्कुलमध्ये घेतली. आठवी लस ही 22 सप्टेंबरला जुन्या हॉट स्कुलमध्येच तर नववा डोस 24 सप्टेंबरला आरोग्य उपकेंद्र कलासन येथे घेतला तर 10 वा डोस हा खगडिया जिल्ह्यातील परबत्ता येथे घेतला. शेवटचा अकरावा डोस हा त्यांनी भागलपूर येथे घेतला.

हेही वाचा - Vaccine By Drone : पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतूक प्रयोग यशस्वी

Last Updated : Jan 6, 2022, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.