ETV Bharat / bharat

न्यूयॉर्कहून परतलेला तरुण निघाला कोरोना पॉझिटिव्ह, आरोग्य विभाग झाला सतर्क

author img

By

Published : Apr 27, 2022, 5:06 PM IST

न्यूयॉर्कहून परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ( USA Returned Man Found Covid Positive ) उत्तरप्रदेशातल्या फारुखाबाद जिल्ह्यात ( Farrukhabad District UP ) आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे. सध्या या तरुणाला घरीच विलीगीकरण करून ठेवण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाचे पथक आज तरुणाच्या घरातील उर्वरित सदस्यांची तपासणी करणार ( Civil Hospital Farrukhabad ) आहे.

Corona
कोरोना

फारुखाबाद ( उत्तरप्रदेश ) : यूपीच्या फारुखाबाद जिल्ह्यात ( Farrukhabad District UP ) न्यूयॉर्कहून परतलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ( USA Returned Man Found Covid Positive ) आरोग्य विभागात चिंतेचे वातावरण आहे. तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्याने विभागाची अस्वस्थताही वाढली आहे. घसादुखी आणि ताप आल्यानंतर तरुणाने सिव्हिल हॉस्पिटल ( Civil Hospital Farrukhabad ) गाठून त्याची तपासणी केली. सध्या या तरुणाला घरीच वेगळे ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे पथक आज घरात राहणाऱ्या लोकांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करणार आहे.

विदेशातून आलेला एक जण जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. वास्तविक, कोतवाली परिसरातील मोहल्ला गणेश प्रसाद स्ट्रीट येथे राहणारा हा तरुण न्यूयॉर्कमध्ये काम करतो. 20 एप्रिल रोजी तो घरी आला. मंगळवारी, तरुण कोविड तपासणीसाठी लिंजीगंज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचला. यादरम्यान तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. शहरातील कोविड सेंटरचे प्रभारी संजय बाथम यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती गोळा केली.

हा तरुण १६ एप्रिल रोजी न्यूयॉर्कहून दिल्लीत आला होता. येथून तो नोएडा येथे राहणाऱ्या त्याच्या जोडीदाराच्या घरी गेला. १९ एप्रिलच्या रात्री ते घरी येण्यासाठी कालिंद्री एक्स्प्रेसमध्ये बसला. तो 20 एप्रिलला सकाळी त्याच्या घरी पोहोचला. 24 एप्रिलला घसादुखी आणि तापाची तक्रार केल्यावर तरुणाने 26 एप्रिलला त्याची तपासणी केली. ज्यात त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या घरात सुमारे 8 सदस्य आणि 9 भाडेकरू आहेत. बुधवारी आरोग्य विभागाची टीम या सर्व लोकांची सॅम्पल टेस्ट करणार आहे.

हेही वाचा : Rajesh Tope PC : महाराष्ट्रात कोरोनाची धोकादायक परिस्थिती नाही, लहान मुलांच्या लसीकरणावर भर देणार - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.