ETV Bharat / bharat

Mystery Girl.. घरात आली तेव्हा १८ वर्षांची, घराबाहेर पडली तेव्हा २८ वर्षांची, वाचा रहस्यमयी कहाणी - Man hides his girlfriend in home

एका तरुणाने आपल्या प्रियसीला तब्बल 10 वर्ष घरामध्येच लपवून ठेवलं. विशेष म्हणजे, घरातील सदस्यांनाही याचा थांगपत्ता लागला नाही. ही घटना केरळच्या पलक्कडमध्ये समोर आली आहे.

केरळ
केरळ
author img

By

Published : Jun 10, 2021, 5:48 PM IST

Updated : Jun 10, 2021, 8:22 PM IST

कोची - प्रेम आंधळ असते असे म्हणतात. प्रेमात लोक काहीही करतात, हे तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल आणि ऐकलंही असेल. प्रेमात लोके एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच बऱ्याच जणांना कळत नाही. अशीच एक पराक्रमी घटना केरळच्या पलक्कडमध्ये समोर आली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र, एका तरुणाने आपल्या प्रियसीला तब्बल 10 वर्ष घरामध्येच लपवून ठेवलं. विशेष म्हणजे, घरातील सदस्यांनाही याचा थांगपत्ता लागला नाही.

नेमकं झाल काय तर, वर्ष 2010 मध्ये नेमरा पोलीस ठाणे क्षेत्रातील अयीरूर येथून एक तरुणी बेपत्ता झाली होती. तेव्हा ती 18 वर्षीय होती. संबधित तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. मात्र, तीचा पत्ता लागला नाही. 2010 पासून ते मार्च 2021 पर्यंत ती आपल्या प्रियकरासोबत त्याच्या घरातील एका खोलीत राहत होती. तोच तीची सर्व काळजी घ्यायचा. अन्न आणि इतर वस्तू देऊन तो खोली बाहेरून बंद करायचा. यात विशेष म्हणजे, तरुणीच्या आई-वडिलांचे घर ती राहत असलेल्या ठिकाणापासून काहीच अंतरावर होते. तसेच तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनाही या गोष्टीचा मागमूसही लागला नाही. सुरुवातीला त्याने विचार केला सर्वांना सांगावे आणि लग्न करावे. परंतु हातात पैशांची कमतरता आणि भीती यामुळे त्याने कुणालाच सांगितले नाही.

प्रकरण कसं आलं उघडकीस...

प्रियकर तीन महिन्यांपूर्वी अचाणक बेपत्ता झाला होता. तेव्हा चितेंत पडलेल्या कुटुंबीयांनी त्याची चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान तरुणासोबत संबंधित तरुणीही असल्याचे समोर आले. तीला घेऊन तो घराबाहेर पडला होता. ते दोघेजण नेमाराजवळ विठानासरी गावात भाड्याच्या घरात राहत होते. मंगळवारी तरुणाच्या भावाने त्यांना शोधून काढले. तेव्हा ही कहाणी उघडकीस आली आहे.

संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. प्रियकरासोबत राहण्याची तरुणीची इच्छा असल्याने न्यायालयाने तीला परवानगी दिली. तिच्या नातेवाईकांनाही यावर आक्षेप घेतला नाही. प्रियकर तीला गेल्या 10 वर्षापासून आपल्याच घरात लपवून ठेवण्यात यशस्वी झाला. त्याच्या आईवडिलांना आणि बहिणीलाही याची माहिती लागली नाही. तसेच तरुणीच्या कुटुंबीयांचे घर त्याच्या घरापासून काहीच अंतरावर होते. ही सर्व माहिती नातेवाईकांकडून गोळा केली गेली आहे आणि याची चौकशी केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Last Updated : Jun 10, 2021, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.