ETV Bharat / bharat

One Crore Compensation : या दुचाकी चालकाला भरपाई म्हणून मिळाले तब्बल 1.58 कोटी! - पथानामथिट्टा

केरळमध्ये रस्ता अपघाताला बळी पडलेल्या एका दुचाकी चालकाला तब्बल 1.58 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वाधिक भरपाई असल्याचे मानले जात आहे.

Compensation
भरपाई
author img

By

Published : Jul 22, 2023, 10:43 PM IST

पथानामथिट्टा (केरळ) : केरळमधील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने बाईक अपघातात जखमी झालेल्या एका 30 वर्षीय व्यक्तीला तब्बल 1.58 कोटी रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही भरपाईची रक्कम केरळमधील दुचाकी अपघातासाठी आतापर्यंत देण्यात आलेली सर्वाधिक भरपाई रक्कम आहे. ही भरपाई मिळवणारा अखिल के बॉबी हा मूळचा पथानामथिट्टा जिल्ह्यातील प्रक्कनमचा रहिवासी आहे.

2017 मधील घटना : 25 जुलै 2017 रोजी एलांथूर गणपती मंदिराजवळ एक अपघात झाला होता. 24 वर्षीय अखिल हा त्याच्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची त्याची धडक बसली. या अपघातात अखिल गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुखापत गंभीर असल्याने अखिलला वेल्लोर ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले.

अपघातानंतर 90 टक्के अपंगत्व आले : या घटनेचा त्याच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला. तो बराच काळ रुग्णालयातच होता. यामुळे त्याला अपंगत्वाचाही सामना करावा लागला. एका वैद्यकीय मंडळाने एमएसीटी न्यायालयात एक वैद्यकीय तपासणी अहवाल सादर केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की, अखिलला मार लागल्याने 90 टक्के अपंगत्व आले. ज्यामुळे त्याच्या पाठीच्या कण्याला तसेच शरीराच्या इतर भागांना नुकसान झाले. तीन दिवसांनी या दुर्घटनेला सहा वर्ष पूर्ण होतील. त्या पूर्वी एमएसीटी न्यायालयाचा हा निकाल अखिलला निश्चितच दिलासा देणारा ठरला आहे.

एका महिन्यात नुकसानभरपाई देण्याचे आदेश : एमएसीटी न्यायालयाचे न्यायमूर्ती जीपी जयकृष्णन यांनी नुकसानभरपाईचे आदेश दिले आहेत. मूळ नुकसान भरपाईची रक्कम 1,02,49,440 एवढी आहे. एकूण नुकसानभरपाईच्या रकमेत 6,17,333 रुपयांची कायदेशीर किंमत आणि मूळ नुकसानभरपाईच्या रकमेवर 9 टक्के व्याज समाविष्ट आहे. व्याजाची गणना 15 मार्च 2018 पासून करण्यात आली होती, ज्या दिवशी केस दाखल झाली होती. न्यायालयाने प्रतिवादी, नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या पथानामथिट्टा शाखा कार्यालयाला एका महिन्यात नुकसानभरपाईची रक्कम वितरित करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

  1. Vande Bharat : वंदे भारत ट्रेनमध्ये मूत्र विसर्जनासाठी जाणे आले अंगलट; प्रवाशाला बसला 6 हजाराचा भुर्दंड

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.