ETV Bharat / bharat

Bihar Crime News : 'आत्महत्या कशी केली जाते?', या व्यक्तीने बनवला स्वत:च्याच मृत्यूचा प्लॅन!, जाणून घ्या काय आहे प्रकरण - एसपी कांतेश कुमार मिश्रा

बिहारच्या एका व्यक्तीने योजना बनवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीच्या मोबाईलची सर्च हिस्टरी चेक केली असता त्याने आत्महत्येचे मार्ग शोधल्याचे आढळून आले. (suicide after searching on google)

Bihar Crime News
बिहार क्राइम न्यूज
author img

By

Published : Jul 17, 2023, 4:20 PM IST

एसपी कांतेश कुमार मिश्रा

मोतिहारी (बिहार) : बिहारच्या मोतिहारीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र प्रसाद यांनी स्वत:च त्यांच्या मृत्यूचा प्लॅन बनवला होता, असे समोर आले आहे. पोलिसांना त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक पुरावे सापडले आहेत, ज्याद्वारे हे उघडकीस आले आहे. (suicide after searching on google)

मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवला : या प्रकरणी एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, आतापर्यंतच्या शोधात समोर आले की, जितेंद्र प्रसाद यांनीच त्यांच्या आत्महत्येची योजना आखली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत स्थानिक आमदारासह तीन जणांची नावे घेतली होती. मृत जितेंद्र प्रसाद यांचा मोबाईल फोन चेक केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 10 जुलैला सकाळी माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र प्रसाद यांचा मृतदेह तलावात सापडला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

गुगलवर आत्महत्येच्या पद्धती शोधल्या : एफआयआर नोंदवल्यानंतर पुढील तपासासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली. घटनेनंतर तिसऱ्या दिवशी जितेंद्र प्रसाद यांचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांच्या मोबाईलची सर्च हिस्टरी चेक केली असता त्यांनी आत्महत्येचे मार्ग शोधल्याचे आढळून आले. पोलिसांनी सांगितले की, जितेंद्र प्रसाद यांनी मोबाईलवर, डोक्यात गोळी झाडल्यानंतर मृत्यूला किती वेळ लागतो आणि मृत्यू आल्यावर काय होते, अशा गोष्टी शोधल्या होते.

पोलिसांचा तपास सुरु : चौकशीदरम्यान आढळून आले की, जितेंद्र प्रसाद यांनी रात्री आत्महत्या केली त्या रात्री त्यांना झोप लागली नव्हती. पहाटे चारच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले. ते रोज मित्राच्या घरी चहा घ्यायचे, पण त्या दिवशी ते त्याच्या घरी गेले नाही. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जितेंद्र प्रसाद घटनेच्या दिवशी सकाळी एकटेच तलावाकडे जाताना दिसले. त्यांची चप्पल तलावाच्या काठावर ठेवलेली आढळून आली. तर मोबाईल दुसऱ्या ठिकाणी ठेवला होता. एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, हे टोकाचे पाऊल उचलण्यासाठी त्यांना कोणी प्रवृत्त केले? त्यांचा छळ कोणाकडून केला जात होता? कोणाच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली? या सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

काय आहे प्रकरण : 10 जुलै रोजी माजी पंचायत समिती सदस्य जितेंद्र प्रसाद यांचा मृतदेह महुआवा गावाजवळ असलेल्या एका तलावात सापडला होता. खून करून मृतदेह तलावात फेकल्याचे मृताचे नातेवाईक सांगत होते. त्यानंतर संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थांनी सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. मृतदेहाचे डोके छिन्नविछिन्न अवस्थेत होते. या घटनेबाबत मृताच्या पत्नीने स्थानिक भाजप आमदार श्यामबाबू यादव यांच्यासह तीन जणांविरुद्ध हत्येचा एफआयआर दाखल केला आहे.

हेही वाचा :

  1. Revenge Porn : आरोपी 8 वर्षांपर्यंत इंटरनेट वापरू शकणार नाही, रिव्हेंज पॉर्न प्रकरणात न्यायालयाचा आगळावेगळा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
  2. Indore Religion Conversion : 9 वर्षीय मुलाचे धर्मांतर, आईच्या प्रियकराने धर्मांतर करून वडिलांच्या जागी लिहिले स्वत:चे नाव!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.