ETV Bharat / bharat

बापाने लेकीच्या मृतदेहाला 10 कि.मी खांद्यावर नेले; छत्तीसगडच्या आरोग्य मंत्र्याकडून चौकशीचे आदेश - ईश्वर दास व्हिडिओ छत्तीसगड

एक बाप आपल्या 7 वर्षीय लेकीच्या मृतदेहाला खांद्यावर घेऊन जात ( Man carrying body of daughter Chhattisgarh ) असल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ शुक्रवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. ही घटना सुरगुजा जिल्ह्यातली होती. याप्रकरणी आता राज्याचे आरोग्य मंत्री टी.एस सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

man carrying body of daughter TS Singh Deo probe
बापाच्या खांद्यावर लेकीचा मृतदेह लखनपूर
author img

By

Published : Mar 26, 2022, 12:07 PM IST

सुरगुजा (छत्तीसगड) - एक बाप आपल्या 7 वर्षीय लेकीच्या मृतदेहाला खांद्यावर घेऊन जात ( Man carrying body of daughter Chhattisgarh ) असल्याचा हृदयद्रावक व्हिडिओ शुक्रवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. ही घटना सुरगुजा जिल्ह्यातली होती. याप्रकरणी आता राज्याचे आरोग्य मंत्री टी.एस सिंह देव यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. मुलीचा मृत्यू शुक्रवारी सकाळी लखनपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात झाला होता. शव वाहन येण्याच्या अगोदरच मुलीच्या वडिलांनी तिचा मृतदेह नेला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

  • Have ordered CMHO to probe the incident, and BMO should be replaced in case of negligence...Concerned health official from Lakhanpur village should have made the father understand to wait for hearse instead of letting him carry the body like that: TS Singh Deo (25.03) pic.twitter.com/cVVwZKmtbP

    — ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - Ukraine Russia War 31st Day : युक्रेन-रशिया युद्ध एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे - जो बायडेन

अमदाला गावातील रहिवासी ईश्वर दास यांनी आपली आजारी मुलगी सुरेखा हिला लखनपूर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात पहाटे आणले होते, असे अधिकारी म्हणाले. मुलीची ऑक्सिजन पातळी खुपच कमी होती, 60 इतकी होती. तिच्या पालकांनुसार तिला गेल्या काही दिवसांपासून खूप ताप होता. आवश्यक उपचार देण्यास प्रारंभ झाला, मात्र तिची प्रकृती खालवली आणि 7.30 ला तिचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य केंद्रात कार्यरत ग्रामीण वैद्यकीय सहाय्यक डॉ. विनोद भार्गव यांनी दिली. शव वाहन लवकर येईल असे आम्ही मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितले होते. ती 9.20 च्या सुमारास आली, मात्र तोपर्यंत ते मुलीच्या मृतदेहासह निघून गेले, अशी माहिती त्यांनी दिली.

  • Surguja: Chhattisgarh Health Min TS Singh Deo orders probe after video of a man carrying body of his daughter on his shoulders went viral

    Concerned health official from Lakhanpur should have made the father understand to wait for hearse instead of letting him go, Deo said(25.3) pic.twitter.com/aN5li1PsCm

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये - व्हिडिओमध्ये बाप आपल्या खाद्यावर मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसून येते. अमदाला या आपल्या घरी पोहचण्यासाठी त्याने पायी 10 कि.मी चे अंतर गाठले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आरोग्य मंत्री सिंह देव यांनी शुक्रवारी जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, असे सांगितले.

मी व्हिडिओ बघितला. तो अस्वस्थ करणारा होता. मी सीएमएचओला या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. जे तेथे कार्यरत आहेत, परंतु त्यांचे कर्तव्य बजावू शकत नाहीत अशांना काढून टाकावे, असे सीएमएचओला सांगितल्याचे देव यांनी पत्रकारांना सांगितले. ड्युटीवर असलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांनी वाहनाची वाट पाहण्याबाबत कुटुंबाची समजूत घालायला पाहिजे होती. त्यांनी अशा गोष्टी होणार नाहीत याची खात्री करायला हवी होती, असे मतही आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - Petrol, Diesel Prices : पेट्रोल, डिझेलचे दर पाच दिवसांत चौथ्यांदा वाढले

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.