ETV Bharat / bharat

Assam Crime News : धक्कादायक! बापाने केला 5 महिन्यांच्या मुलाचा छळ, तोडले हातपाय! - बापाने केला मुलाचा छळ

आसाममधील गुवाहाटी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या लहान मुलाचा छळ करून त्याचे हातपाय तोडले. जखमी मुलावर उपचार सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Man breaks limbs of 5 month old son
बापाने केला 5 महिन्यांच्या मुलाचा छळ
author img

By

Published : Mar 5, 2023, 9:59 AM IST

गुवाहाटी (आसाम) : आसाममधील गुवाहाटी शहराच्या हद्दीतील काहिलीपार येथे एका व्यक्तीला त्याच्याच 5 महिन्यांच्या मुलाचा छळ करून त्याचे हातपाय तोडल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. ही धक्कादायक घटना काहिलीपार येथील पत्रकार कॉलनीत घडली. अत्याचाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पत्नीच्या नकळत मुलावर अत्याचार : अल्केश गोस्वामी असे आरोपी वडीलांचे नाव असून ते आता भागदत्तपूर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीच्या नकळत मुलावर अत्याचार करत होता. हातपाय तोडण्याची ही भीषण घटना गुरुवारी घडली. हे मूल गुरुवारी आणि शुक्रवारी रात्रीही रडत होते. मुलाच्या सततच्या रडण्यामुळे त्या आवारात राहणाऱ्या एका महिलेला काहीतरी गडबड होत असल्याचा संशय आला होता. त्यानंतर तिने पोलिसांना या प्रकरणी माहिती दिली.

पोलिसांनी केली अटक : शुक्रवारी मुलाला गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. त्याचे दोन्ही पाय आणि एक हात फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी स्थानिकांनी मुलाच्या वडिलांकडे चौकशी केली. यावेळी अल्केश गोस्वामीने आपल्या मुलावर शारीरिक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी अल्केश गोस्वामी यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्केश गोस्वामी हे काहिलीपारा येथील पत्रकार कॉलनीत भाडेकरू म्हणून राहत होते. ते आपल्या मुलाचा अशा प्रकारे छळ करण्यास कशामुळे प्रवृत्त झाले, हे अद्याप उघड झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेचा तपास अद्याप जारी आहे.

भिवंडीत टेम्पो चालकाचा खून : मुलीची बॅग चोरल्याच्या संशयातून दोघा मित्रांनी एका टेम्पो चालकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नुकतेच भिवंडीत घडली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलीस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. या दोघांनी मुलीची बॅग चोरल्याच्या संशयातून टेम्पो चालकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा : Buldhana Crime: धक्कादायक! शिक्षकाने केले दोन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण, बुलडाण्यातील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमधील घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.