ETV Bharat / bharat

ममता दीदींचे मोदींना पत्र; लस पुरवठा करण्याची केली मागणी - ममता दीदींचे मोदींना पत्र

पश्चिम बंगालमधील कोरोना संकटाची तीव्रता लक्षात घेता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. दीदींनी मोदींकडे कोरोना लसीची मागणी केली आहे.

ममता -मोदी
ममता -मोदी
author img

By

Published : Apr 18, 2021, 11:33 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमधील कोरोना संकटाची तीव्रता लक्षात घेता ममता यांनी पंतप्रधानांकडून कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत मदत मागितली आहे. आपल्या दोन पानांच्या पत्रात ममता यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम बंगालसाठी कोरोना लसीचे आणखी 5.4 कोटी डोस देण्यास सांगितले आहे.

'लसीकरण सर्वात महत्वाचे आहे. राज्यात, विशेषत: कोलकातामध्ये, लोकसंख्येची घनता जास्त आहे. त्यामुळे जलद लसीकरण आवश्यक आहे. दुर्दैवाने आमच्यासाठी भारत सरकारकडून लसींचा पुरवठा कमी व अनिश्चित आहे, यामुळे राज्यातील लसीकरणावर नकारात्मक परिणाम होत आहे. आम्हाला 2.7 कोटी लोकांचे लसीकरण करायचे आहे. त्यासाठी सध्या राज्याला 5.4 कोटी डोस आवश्यक आहेत, असे दीदींनी पत्रात म्हटलं आहे.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र -

यापूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना पाच महत्त्वपूर्ण सूचना देणारे पत्र लिहिले होते. कोरोनावरील लसीकरण मोहीमेला वेग देण्याची गरज आहे, असं मनमोहनसिंग यांनी पत्रात म्हटलं आहे. मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारला पत्रातून महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.

हेही वाचा - पश्चिम बंगालमधील सर्व राजकीय सभा रद्द; राहुल गांधींचा कौतुकास्पद निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.