ETV Bharat / bharat

भाजपाविरोधात लढा पुकारण्याची हीच वेळ; टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी यांचे बिगर भाजपा नेत्यांना पत्र - ममता बॅनर्जी यांचे बिगर भाजपा नेत्यांना पत्र

तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी भाजपा वगळता सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. जवळपास सात पानांचे खरमरीत पत्र ममतांनी लिहले आहे. भाजपाने लोकशाही आणि संविधानावर हल्ला केला आहे. या हल्ल्याच्या विरोधात एकत्रित येऊन प्रभावीपणे संघर्ष केला गेला पाहिजे, असे ममता यांनी पत्रात म्हटलं.

mamata banerjee
सुप्रीमो ममता बॅनर्जी
author img

By

Published : Mar 31, 2021, 7:27 PM IST

कोलकाता - तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी भाजपा वगळता सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. ममतांनी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित होणे आवश्यक आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता यांनी पत्रात लिहिले आहे. जवळपास सात पानांचे खरमरीत पत्र ममतांनी लिहले आहे. भाजपाने लोकशाही आणि संविधानावर हल्ला केला आहे. या हल्ल्याच्या विरोधात एकत्रित येऊन प्रभावीपणे संघर्ष केला गेला पाहिजे, असे ममता यांनी पत्रात म्हटलं.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान ममता बॅनर्जी, काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टालिन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन , आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बीजद अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती आणि माकपचे सरचिटणीस यांना पत्र लिहिले आहे.

दीदींच्या पत्रातील प्रमुख मुद्दे -

  • ज्या राज्यात भाजपाचे सरकार नाही, तेथे राज्यपाल हे भाजपा कार्यकर्त्यांप्रमाणे वागतात.
  • ईडी, सीबीआय आणि अन्य तपास यंत्रणा राज्यांतील नेत्यांविरूद्ध उभ्या आहेत.
  • नॉन-भाजपा शासित राज्यांना पैसे देण्यास केंद्र सरकार टाळाटाळ करत आहे.
  • मोदी सरकारला सर्व सरकारी मालमत्ता विकायच्या आहेत. ही लोकांची फसवणूक आहे.
  • आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत दोनदा भाजपला पराभूत केले आहे. जेव्हा लोकशाही पद्धतीने भाजपा जिंकू शकली नाही, तेव्हा त्यांना राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करण्याचा मार्ग शोधला.
  • भाजपाचे केंद्र सरकार लोकशाही संपवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे दिल्ली सरकारविरूद्ध एनसीटी विधेयक मंजूर झाले. केंद्र सरकारने जनतेने निवडलेल्या सरकारची सत्ता काढून उपराज्यपालानां दिली.

हेही वाचा - बिग फाईट ! पश्चिम बंगालमध्ये उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ममता-सुवेंदू थेट भिडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.