ETV Bharat / bharat

दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी ममतांनी घेतली कॅबिनेट बैठक - Mamata Banerjee meet Cabinet

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी आपल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक घेतली. या बैठीकत काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाही.

Mamata Banerjee
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Jul 25, 2021, 1:39 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक घेतली. या बैठीकत काय चर्चा झाली, याची माहिती अद्याप समोर आली नसून यापूर्वी गुरुवारी कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक झाली होती. कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुंख्यमंत्री सांयकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात ममता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 28 मेला भेट घेणार आहेत. याशिवाय त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही भेट घेणार असल्याची माहिती आहे. ममतांचा हा दौरा पुढील वर्षातील विधानसभा निवडणुक आणि 2024 च्या लोकसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीर असल्याचे बोलले जात आहे. ममता आतापासून निवडणुकीच्या तयारीला लागल्या असून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला आव्हान दिले आहे.

भाजपा सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणण्यावर त्यांचा भर असल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला चारीमुंड्या चीत केल्यानंतर ममता आता राष्ट्रीय राजकारणात उतरल्या आहेत. नुकतेच ममतांची खासदार नसतानाही तृणमूल काँग्रेसच्या संसदीय दल नेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे टीएमसीच्या संसदीय मंडळाच्या अध्यक्ष झाल्यानंतर देशपातळीवर त्या थेट पक्षाचा अधिकृत चेहरा बनल्या आहेत. म्हणजे पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील कोणत्याही विषयावर विरोधी पक्षांच्या संसदीय मंडळाच्या नेत्यांची बैठक बोलावली, तर ममतांना बोलावले जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.