ETV Bharat / bharat

२०२४ मध्ये मोदी Vs खरगे सामना रंगणार? 'INDIA' बैठकीत ममता बॅनर्जींचा प्रस्ताव

INDIA Meeting : नवी दिल्लीत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच आघाडीच्या बहुतांश नेत्यांचं याला समर्थन असल्याचं म्हटलं जातंय.

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2023, 7:15 PM IST

नवी दिल्ली INDIA Meeting : विरोधकांच्या 'इंडिया' (I.N.D.I.A.) आघाडीच्या नेत्यांची चौथी बैठक आज (१९ नोव्हेंबर) दिल्लीत पार पडली. या बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि आरएलडीचे नेते जयंत चौधरी उपस्थित होते.

  • #WATCH | After the conclusion of the INDIA Alliance meeting, Congress president Mallikarjun Kharge says" Our first priority is to win (elections). We will think about winning before deciding the name of the Prime Minister. If there will be no MPs, it makes no sense talking about… pic.twitter.com/11rf9YoCOz

    — ANI (@ANI) December 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधानपदासाठी खरगेंचं नाव सुचवलं : सूत्रांनुसार, या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी याला पाठिंबा दिला. ममता बॅनर्जींच्या या प्रस्तावाला कोणाचाही विरोध नव्हता, असं एमडीएमके खासदार वायको यांनी बैठकीनंतर सांगितलं. मात्र, या प्रश्नावर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मौन बाळगलं आहे.

  • #WATCH | After the INDIA Alliance meeting, SP chief Akhilesh Yadav says, "...All parties are ready to hit the ground after the distribution of tickets very soon."

    He also says, "I have said from the first day that the strategy of INDIA Alliance will be PDA. We will defeat… pic.twitter.com/nT5EJk1jHW

२८ विरोधी पक्ष सहभागी : 'इंडिया' आघाडीच्या चौथ्या बैठकीत २८ विरोधी पक्ष सहभागी झाले होते. बैठकीत, देशभरात किमान ८-१० बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपा सरकारमध्ये खासदारांना संसदेतून निलंबित केले जात आहे. हे अलोकतांत्रिक आहे. यासाठी सर्वांना एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. त्यासाठी आम्ही तयार आहोत, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

  • #WATCH | After the INDIA Alliance meeting, RJD MP Manoj Jha says, "Discussions were held clearly. Seat-sharing, mass contact program - all of these will begin within 20 days...All decisions will be taken within 3 weeks." pic.twitter.com/z04wXmeYZj

जागावाटपावर चर्चा : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा मुद्दा या बैठकीचा केंद्रबिंदू होता. बैठकीत भाजपविरोधात ४०० जागांवर विरोधी उमेदवार उभे करण्याच्या टार्गेटवर चर्चा झाली. यापैकी २७५ ते ३०० जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करण्यास उत्सुक आहे. तर इतर पक्षांना २०० ते २५० जागा मिळू शकतात. यासह 'इंडिया' च्या बैठकीत समन्वयकाच्या नावावर चर्चा झाली. त्यासाठी उद्धव ठाकरे, नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्या नावांचा विचार केला जाऊ शकतो.

  • #WATCH | After the INDIA Alliance meeting, Congress MP and general secretary KC Venugopal says, "It was a very successful, fruitful meeting. Everybody opened their mind and spoke, there was a little criticism here and there because we are 25-26 parties. The main focus was to… pic.twitter.com/rDnMoefeeN

खासदारांच्या निलंबनाचा निषेध : 'इंडिया' च्या आजच्या बैठकीत लोकसभा आणि राज्यसभेतील १४१ खासदारांच्या निलंबनावर चर्चा झाली. विरोधी पक्षांनी खासदारांच्या निलंबनाचा निषेध केला आहे. या बैठकीत मोदी आणि भाजपाला विरोध करण्याबरोबरच 'इंडिया' ची योजना काय असेल, यावरही चर्चा झाली. बैठकीपूर्वी काँग्रेसनं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ५ सदस्यांची राष्ट्रीय आघाडी समिती स्थापन केली. अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश हे त्याचे सदस्य आहेत. मुकुल वासनिक यांना समितीचं समन्वयक बनवण्यात आलं आहे.

  • #WATCH | After the conclusion of the INDIA Alliance meeting, Congress president Mallikarjun Kharge says "We have passed a resolution that suspension is undemocratic. We will all have to fight to save democracy and all of us are ready to do that. We raised the issue of security… pic.twitter.com/nuDVQUe2Lg

हे वाचलंत का :

  1. तृणमूलच्या खासदारानं संसदेबाहेर केली उपराष्ट्रपतींची नक्कल, Watch Video
  2. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांचं निलंबन, आतापर्यंत 141 खासदार निलंबित, एनसीपीनं केला निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.