ETV Bharat / bharat

व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जी यांची डरकाळी; म्हणाल्या... 'जखमी वाघीण जास्त घातक, खेला होबे'

ममता बॅनर्जी यांना रविवारी व्हीलचेअरवर बसून प्रचार रॅलीत सहभाग घेतला. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. मी आतापर्यंत अनेक हल्ल्यांचा सामना केला आहे. मात्र, कधीच झुकले नाही. मला प्रचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला आहे. मी व्हीलचेअरवर बसून प्रचार करणार आहे. जखमी जखमी वाघीण जास्त घातक असते, या शब्दात त्यांनी भाजपाला आव्हान दिले.

ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी
author img

By

Published : Mar 15, 2021, 8:47 AM IST

Updated : Mar 15, 2021, 12:34 PM IST

कोलकाता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ममता बॅनर्जी पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. रविवारपासून ममता यांनी व्हीलचेअरवरुन आपल्या प्रचाराला सुरवात केली. कोलकातामधील हजारात त्यांनी सभेला संबोधित केले. जखमी वाघिण जास्त घातक असते, अशा शब्दात त्यांना भाजपाला आव्हान दिले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी आणि इतर तृणमूलचे नेते उपस्थित होते.

व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जी यांची सभा

ममता बॅनर्जी यांना रविवारी व्हीलचेअरवर बसून प्रचार रॅलीत सहभाग घेतला. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. मी आतापर्यंत अनेक हल्ल्यांचा सामना केला आहे. मात्र, कधीच झुकले नाही. मला प्रचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला आहे. मी व्हीलचेअरवर बसून प्रचार करणार आहे. जखमी जखमी वाघीण जास्त घातक असते, या शब्दात त्यांनी भाजपाला आव्हान दिले.

मायभूमीची रक्षा करत आलो आहोत आणि येथून पुढेही करत राहणार. कधीच वाकणार नाही. दुखापतीचा मला आताही त्रास होत आहे. मात्र, माझे दु:ख हे तुमच्या दु:खापेक्षा कमी आहे, असे त्या म्हणाल्या.

दीदींच्या पायला दुखापत -

नंदीग्रामध्ये प्रचारादरम्यान धक्का लागल्याने ममता बॅनर्जी खाली पडल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर ममतांना कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर रविवारपासून ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरुन आपला प्रचाराला सुरवात केली.

ममता यांचा सुरक्षा संचालक निलंबित -

ही घटना हल्ला नसून, केवळ अपघात असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिला आहे. सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दीदींचे सुरक्षा संचालक विवेक सहाय यांना निलंबित केले आहे. दीदींवरील हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. तर भाजपाच्या एका शिष्टमंडळाने भारतीय निवडणूक आयोगाची भेट घेत, कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच हा हल्ला नौंटकी असल्याचे काही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं.

हेही वाचा - 'ममता बॅनर्जी नाटक करतात तर, यशवंत सिन्हांना राजकारणाचं अपचन'

Last Updated : Mar 15, 2021, 12:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.