ETV Bharat / bharat

mallikarjun kharge पक्षामध्ये शिस्त आवश्यक, हायकमांड घेतील तो निर्णय अंतिम - मल्लिकार्जून खर्गे - पक्षामध्ये शिस्त आवश्यक

राजस्थानमध्ये राजकीय पेच ( Rajasthan Political Crisis ) वाढला आहे. दिल्लीतील निरीक्षक आमदारांच्या विरोधानंतर ते बैठक न घेताच दिल्लीला परतले. आमदारांच्या मनोवृत्तीबाबत मल्लिकार्जुन खर्गे ( Congress leader Mallikarjun Kharge ) म्हणाले की, पक्षात शिस्त आवश्यक असून पक्षाध्यक्षा सोनिया गांधी जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना स्वीकारावा लागेल.

mallikarjun kharge
mallikarjun kharge
author img

By

Published : Sep 26, 2022, 4:21 PM IST

जयपूर : राजस्थानमधील मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा करण्यासाठी आणि आमदारांशी वन टू वन चर्चा करण्यासाठी जयपूरला आलेले निरीक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे दिल्लीला परतले. दोन्ही निरीक्षकांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत हॉटेलमध्ये पोहोचले होते, मात्र माकन भेट न घेताच परतले. दुसरीकडे, दुसरे निरीक्षक, मल्लिकार्जुन खर्गे ( Congress leader Mallikarjun Kharge ) यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिष्टाचाराच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काल आमदारांच्या निषेधाचा तीव्र शब्दात निषेध केला आणि पक्षात शिस्त आणि एकजूट असायला हवी असे सांगितले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य करावा लागणार आहे.

राजस्थान काँग्रेसमध्ये आजकाल काहीही चांगले चाललेले ( Rajasthan Political Crisis ) नाही. काँग्रेसच्या आमदारांनी एका सुरात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री न करण्याबाबत पक्ष निरीक्षकांकडे मागणी केली. तर दिल्लीहून आलेले पक्ष निरीक्षक अजय माकन यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या भूमिकेवर सर्वप्रथम प्रश्न उपस्थित केला आणि दिल्लीला परतताना त्यांची भेटही घेतली नाही.

दुसरीकडे दुसरे निरीक्षक मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलाविल्यामुळे मी गेहलोत यांना भेटायला गेलो होतो. येथे जे काही घडले ते पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षात शिस्त असली पाहिजे आणि एकता असली पाहिजे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी जो काही निर्णय घेतील, तो सर्वांना मान्य करावा लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.