ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींवरील आक्षेपार्ह टिप्पणी भोवली, मालदीवचे तीन मंत्री निलंबित?

Maldives Minister : मालदीव सरकारनं मंत्री मरियम शिउना, मलशा आणि हसन झिहान यांना निलंबित केल्याचं वृत्त आहे. यांनी पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. मात्र आपल्या निलंबनाचं वृत्त खरं नसल्याचं एका मंत्र्यांनं स्पष्ट केलं आहे.

Maldives
Maldives
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 6:14 PM IST

Updated : Jan 9, 2024, 6:49 PM IST

नवी दिल्ली Maldives Minister : मालदीव सरकारने पंतप्रधान मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल आपल्या मंत्र्यांविरुद्ध कारवाई केल्याचं वृत्त आहे. सरकारनं मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान या मंत्र्यांना रविवारी निलंबित केल्याची ही बातमी आहे. भारताबद्दलच्या आक्षेपार्ह टिप्पण्यांसाठी जबाबदार असलेल्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या पदांवरून तत्काळ निलंबित करण्यात आल्याचं वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र मालदीवचे उपमंत्री हसन झिहान यांनी स्थानिक माध्यमांच्या ट्विटचा हवाला देत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मंत्रिमंडळातून इतर मंत्र्यांसह निलंबनाच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तसंच याला 'फेक न्यूज' म्हटलय. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह कमेंट : मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती. यानंतर भारतानं मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारकडे हा मुद्दा मांडला होता. माले येथील भारतीय उच्चायुक्तांनी मंत्र्यांच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला होता. यानंतर मालदीव सरकारनं एक निवेदन जारी केलं. हे या मंत्र्यांचं वैयक्तिक मत आहे. मंत्र्यांच्या टिप्पण्या मालदीव सरकारच्या विचारांचं प्रतिनिधित्व करत नाहीत, असं या निवेदनात म्हटलं होतं.

माजी राष्ट्रपती सोलिह यांची प्रतिक्रिया : या प्रकरणी मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची प्रतिक्रियाही समोर आली. मालदीव सरकारच्या मंत्र्यांकडून सोशल मीडियावर भारताविरोधात वापरण्यात येत असलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा मी निषेध करतो, असं ते म्हणाले. भारत हा मालदीवचा नेहमीच चांगला मित्र राहिला आहे. अशा कठोर टिप्पण्यांमुळे दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ नये, असं त्यांनी नमूद केलं.

#Boycott Maldives नंबर वन ट्रेंड : या वादानंतर सोशल मीडियावर सध्या #Boycott Maldives नंबर वन ट्रेंड करत आहे. अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, सलमान खान, कंगना राणावत यांसारख्या सेलिब्रेटींनीही यावर प्रतिक्रिया दिली. या सर्व स्टार्सनी चाहत्यांना मालदीवऐवजी भारतातील लक्षद्वीपसारख्या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचलंत का :

  1. सोशल मीडियावर #Boycott Maldives ट्रेंड का होतंय? मोदींच्या लक्षद्वीप पोस्टचा काय संबंध?
  2. भारतीयांबाबतच्या वादग्रस्त पोस्टनंतर मालदीव बॅकफूटवर, सरकारनं जारी केलं निवेदन

Last Updated : Jan 9, 2024, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.