ETV Bharat / bharat

Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून होणार हकालपट्टी? आचरण समितीची शिफारस - TMC

Mahua Moitra : टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात आचरण समितीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला आहे. अहवालाच्या बाजूनं 6 तर, विरोधात 4 मते पडली. याआधी मोइत्रांविरुद्धचा अहवाल आचरण समितीत मांडण्यात आला. काँग्रेसच्या खासदारांनी मोइत्रांच्या बाजूनं मतदान केलं.

Mahua Moitra
Mahua Moitra
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 7:42 PM IST

Updated : Nov 9, 2023, 8:22 PM IST

नवी दिल्ली Mahua Moitra : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याप्रकरणी टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरोधातील प्रस्ताव लोकसभेच्या आचरण समितीनं मंजूर केला आहे. सहा खासदारांनी महुआ मोईत्रा यांच्या विरोधात प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं. त्याचवेळी या प्रस्तावावर विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांची संख्या 4 होती. विशेष म्हणजे निलंबित काँग्रेस खासदार प्रनीत कौर यांनी या प्रस्तावाच्या बाजूनं मतदान केलं. समितीनं आपल्या प्रस्तावात महुआ यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे.

लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस : समितीचे पॅनल प्रमुख विनोद सोनकर बैठकीनंतर म्हणाले की, समितीच्या सहा सदस्यांनी अहवालाचं समर्थन केलं आहे. तर चार सदस्यांनी विरोध केला. समितीनं मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस केल्याचं सूत्रांनी सांगितलं. आता पुढील कारवाईसाठी हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडं पाठवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, मोईत्रा यांची खासदारकी काढून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांनी लाचेच्या बदल्यात उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्या सांगण्यावरून अदानी समूहाला लक्ष्य करण्यासाठी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. मोईत्रा यांनी आरोप फेटाळून लावले होते.

खासदार दानिश अलींचा गंभीर आरोप : बहुजन समाज पक्षाचे (BSP) खासदार दानिश अली यांनी आरोप केला की, आचरण समितीचे प्रमुख विनोद कुमार सोनकर तसंच भाजपा सदस्यांनी कारवाईची माहिती तृणमूल काँग्रेसला लीक केली. महुआ मोईत्रा प्रकरणात समितीच्या कार्यवाहीची माहिती लिक करणं हे नियमांचं उल्लंघन आहे. समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या अली यांनी नियमांचं उल्लंघन करून समितीच्या कार्यवाहीची माहिती लीक झाल्याचं सांगितलं.

मोईत्रा यांच्या वर्तनाचा निषेध : समितीच्या अहवालात मोईत्रा यांच्या वर्तनाचा निषेध करण्यात आल्याचं वृत्त आहे. 'अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक, गुन्हेगारी' कृत्य मोईत्रा यांनी केल्याचं अहवालात म्हटल्याचं सुत्रांनी सांगितलंय. या प्रकरणाची चौकशी करण्याचं आवाहनही सरकारला करण्यात आलं आहे. या समितीमध्ये एकूण 15 सदस्य आहेत. या समितीत भाजपाचे सात, काँग्रेसचे तीन, बसपा, शिवसेना, वायएसआर काँग्रेस पक्ष, सीपीएम, जेडीयूच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. Cash For Query Allegation : खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, लोकसभेच्या आचरण समितीची आज बैठक
  2. Cash For Query Case : कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढणार?
  3. Mahua on Hiranandanis affidavit : 'कॅश फॉर क्वेरी' प्रकरणात पश्चिम बंगालच्या खासदार महुआ मोईत्रा यांचा गंभीर आरोप, म्हणाल्या...

Last Updated : Nov 9, 2023, 8:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.