मुंबई: इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) ची सर्वात यशस्वी फ्रँचायझी असलेल्या मुंबई इंडियन्स ( MI ) ने स्वतःसाठी एक मोठी योजना आखली आहे. तसेच त्या दिशेने जोरदार पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई फ्रँचायझीला आता जगभरातील लीगमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. आयपीएलशिवाय या फ्रँचायझीने परदेशी लीगमध्येही दोन संघ खरेदी केले आहेत. हे लक्षात घेऊन भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीन खान आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुंबई फ्रँचायझीने झहीर खानला हेड ऑफ क्रिकेट डेवलपमेंट पदी बढती ( Zaheer Khan promoted as Head of Cricket Development ) दिली आहे. तर जयवर्धनेची हेड ऑफ परफॉर्मेंस ( Mahela Jayawardene as Head of Performance ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजेच आता या दोन्ही दिग्गजांवर फ्रँचायझीच्या तिन्ही संघांची संपूर्ण जबाबदारी असेल. जयवर्धने आता तिन्ही संघांचे जागतिक प्रशिक्षकही असतील. म्हणजेच मुंबई इंडियन्ससह तिन्ही संघांसाठी स्वतंत्रपणे तीन नवीन प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तिन्ही संघांमध्ये समन्वय राखण्यासाठी जयवर्धने संघाच्या मुख्य प्रशिक्षकांशी जवळून काम करेल.
-
𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝗠𝗜𝗻𝗱 & 𝗭𝗔𝗞 get their 🆕 roles! 💙
— Mumbai Indians (@mipaltan) September 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read more 👇#OneFamily #MumbaiIndians #MIemirates #MIcapetown @MIEmirates @MICapeTown @MahelaJay @ImZaheer https://t.co/D0nUxLL0Aa
">𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝗠𝗜𝗻𝗱 & 𝗭𝗔𝗞 get their 🆕 roles! 💙
— Mumbai Indians (@mipaltan) September 14, 2022
Read more 👇#OneFamily #MumbaiIndians #MIemirates #MIcapetown @MIEmirates @MICapeTown @MahelaJay @ImZaheer https://t.co/D0nUxLL0Aa𝗠𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝗠𝗜𝗻𝗱 & 𝗭𝗔𝗞 get their 🆕 roles! 💙
— Mumbai Indians (@mipaltan) September 14, 2022
Read more 👇#OneFamily #MumbaiIndians #MIemirates #MIcapetown @MIEmirates @MICapeTown @MahelaJay @ImZaheer https://t.co/D0nUxLL0Aa
झहीरकडे असणार टॅलेंट शोधण्याचे काम -
खेळाडूंना विकासित करण्याची मुख्य जबाबदारी झहीर खानची असेल. झहीरकडे प्रतिभा शोधण्याची आणि त्याची एमआय फ्रँचायझी मजबूत करण्याची जबाबदारीही असेल. मुंबई फ्रँचायझी या धोरणासाठी प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे या फ्रँचायझीने जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि इशान किशनसारखे खेळाडू दिले आहेत.
केंद्रीय संघ तयार करण्याचा उद्देश -
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) व्यतिरिक्त, मुंबई फ्रँचायझीकडे परदेशी लीगमध्येही दोन संघ आहेत. हे संघ एमआय एमिरेट्स ( MI Emirates ) आणि एमआय केप टाऊन ( MI Cape Town ) आहेत. एमिरेट्स संघ हा आंतरराष्ट्रीय लीग टी-20 ( ILT20 ) आणि केपटाऊन दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमधील संघ आहे. फ्रँचायझीचे मालक इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ( Reliance Industries Limited ) ही कंपनी आहे.
फ्रँचायझीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांना तिन्ही संघांसाठी मध्यवर्ती संघ तयार करायचा आहे. यामुळे अनेक गोष्टी आणि नियोजन सोपे होईल. फ्रेंचायझीच्या मालकाला जागतिक स्तरावर एमआय वाढवायचे आहे. सध्या फ्रँचायझीकडे तीन संघ आहेत. भविष्यातही त्यात वाढ होऊ शकते.
मुंबईने सर्वाधिक 5वेळा आयपीएलचे विजेतेपद -
यापूर्वी जयवर्धने मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक होते, तर झहीर खान क्रिकेट ऑपरेशन्सचे संचालक होते. मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये आतापर्यंत 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई संघ 2013, 2015, 2017, 2019, 2020 मध्ये चॅम्पियन ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्ज आहे, ज्याने 4 वेळा विजेतेपद पटकावले आहे.