बीडच्या खासदार प्रीतम मुंडें यांनी लोकसभेत कामकाजदरम्यान खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या निधीवर भाष्य केले. खासदारांना त्यांना विकास निधी वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केले. तसेच गेल्या सरकारच्या काळात जे प्रकल्प मंजूर झाले होते. ते प्रकल्प सध्याचे सरकार रद्द करत आहे, असे प्रीतम मुडें म्हणाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद््भवलेल्या परिस्थितीमुळे खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या निधीलाही कात्री लावण्यात आली होती. खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांसाठी दरवर्षी खासदारांना पाच कोटी रुपये विकास निधी मिळतो. त्यातून त्यांच्या मतदार संघात विविध विकास कामे केली जातात. केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन विभागाच्यावतीने 8 एप्रिल 202 रोजी परिपत्रक काढून खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमास् न राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 20-21 तसेच 2021 -2022 या दोन वर्षांसाठी खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम राबवू नये अशा सूचना देण्यात आल्या.
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले? - महाराष्ट्रातील खासदारांचे लोकसभेत भाषण
19:47 February 13
19:47 February 13
खासदार डॉ भारती प्रवीण पवार यांनी जिल्ह्यातील प्रश्नांवर सदनाचे लक्ष वेधले. कोरोना संकटात किंवा नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांनी मोठ्या धैर्याने अर्थव्यस्थेला तारलं. मात्र, शेतकऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. माझ्या जिल्ह्यातील एका गावात एक-दोन जणांनी वीज बील न भरल्यावर संपर्ण गावाचीच वीज खंडीत करण्यात आली. या घटनेचा मी निषेध करते. यावर महाराष्ट्र सरकारने लवरकर लक्ष द्यावं आणि वीज पूरवठा सुरळीत करावा. तसेच वीज बील भरण्यासाठी शेतकऱयांना सूट द्यावी, असे त्या म्हणाल्या.
19:41 February 13
आज लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक वादावर चर्चा केली. जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात आहे. तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित प्रदेश केला जावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केली. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान सीमावाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात सीमवर्ती भागाच्या हक्कावरून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक हा न्यायालयीन लढा सुरु आहे.
19:40 February 13
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेत माथाडी कामगाराच्या समस्या मांडल्या.
17:51 February 13
संरक्षण विभागाच्या "डीआरडीओ'अंतर्गत (संरक्षण संशोधन आणि विकास आस्थापना) कार्यरत असलेल्या वाहन संशोधन आणि विकास संस्था (व्हीआरडीई) ही बंद करून ती चेन्नई किंवा अन्य ठिकाणच्या शाखेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरु असल्याच्या अफवा आहेत. यावर प्रकाश टाकण्याची विनंती खासदार डॉ. विखे पाटील यांनी केली. सैन्यदलाला लागणारी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे बनविण्यात नगरच्या "व्हीआरडीई'ची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. यामध्ये वैज्ञानिक, अधिकारी व कर्मचारी, कामगार, असे जवळपास एक हजार जण कार्यरत आहेत. त्यातून त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, असे त्यांनी सांगितले.
17:51 February 13
भिवंडी लोकसभा खासदार कपिल मोरेश्वर पाटील यांनी कळवा-ऐरोली उन्नत (एलिव्हेटेड) रेल्वेमार्गासंबंधित समस्या मांडल्या. कळवा-ऐरोली उन्नत (एलिव्हेटेड) रेल्वामार्गासाठी सन 2015 मध्ये रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देऊन 428 कोटींचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. तीन लोकसभा मतदारसंघाना ही रेल्वे लाईन जोडते. मात्र, अद्याप याचे काम सुरू झाले नाही. हे काम सुरू होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
17:50 February 13
खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील महत्वाच्या प्रश्नाबाबत सदनाचे लक्ष वेधले. त्यांनी गिरणा नदीवरील वरखेड-लोंढे प्रकल्पाबाबतच्या समस्या मांडल्या.
17:49 February 13
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेतकऱयांच्या समस्या मांडल्या.
16:47 February 13
रामदास तडस हे भाजपचे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी आज लोकसभेत जिल्ह्यातील वाहतुकीसंदर्भात समस्या मांडल्या. कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
16:47 February 13
शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी महिला आणि पोषण आहारावर चर्चा केली आणि समस्या मांडल्या. महिला सक्षमी करण्यात यावं, असे त्या म्हणाल्या.
16:26 February 13
संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?
खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी आज लोकसभेत कामकाजादरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या कामाबाबत चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना संसदेतील उत्कृष्ट कामकाजाबद्दल केंद्रीय मंत्री मनसुकलाल मानडवीया यांच्या हस्ते भारत गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलं आहे.