ETV Bharat / bharat

बस - ट्रेनमधील बलात्काराच्या 'या' घटनांनी हादरले होते महाराष्ट्र, वाचा सविस्तर... - Pushpak Express woman physical abuse

लखनौहून मुंबईच्या दिशने येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांनी २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यामुळे आता महिला कुठेच सुरक्षित नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात वाहनांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे झाले आहे. या घटनांची माहिती देणारा 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 9, 2021, 7:02 PM IST

Updated : Oct 9, 2021, 10:48 PM IST

हैदराबाद - देशातच नव्हे तर, महाराष्ट्रातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती. त्यानंतर राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यानंतर आता एक मोठी घटना समोर आली आहे. लखनौहून मुंबईच्या दिशने येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडेखोरांनी २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यामुळे आता महिला कुठेच सुरक्षित नाही का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राज्यात वाहनांमध्ये अशा प्रकारची घटना घडल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे झाले आहे. या घटनांची माहिती देणारा 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट.

हेही वाचा - शाहरुख खानच्या वाहन चालकाला 'एनसीबी'चे समन्स, चालक चौकशीसाठी कार्यालयात हजर

राज्यात बस आणि ट्रेनमध्ये झालेले महिलांवरील अत्याचार प्रकरणे :

1) पुष्पक एक्सप्रेसमध्ये तरुणीवर अत्याचार

लखनौहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या धावत्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा पडला. ही घटना इगतपुरी ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान शुक्रवारी (8 ऑक्टोबर 2021) घडली. सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये अचानक प्रवेश केला आणि १० ते २० प्रवाशांना धाक दाखवून रोकड, मोबाईल आणि दागिने लुटल्याचा प्रकार घडला.

दोघे अटकेत

धक्कादायक बाब म्हणजे, या दरोडेखोरांनी २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने पुन्हा एकदा रेल्वे प्रवाशांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला असून, २ दरोडेखोर ताब्यात घेतले आहे. तर ६ अद्यापही फरार असल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांना मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुष्पक एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर ट्रेन बोगद्याजवळ पोहोचली. त्यावेळी ट्रेन स्लो असल्याने रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनतर प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व दरोडेखोर प्रवाशांकडून मोबाईल आणि पैसे हिसकावून घेत होते. प्रतिकार करणाऱ्या प्रवाशांना त्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. दरोडेखोरांच्या हातात फाइटर आणि बेल्ट होता. धक्कादायक बाब म्हणजे, एका २० वर्षीय प्रवाशी तरुणीसोबत दरोडेखोरांनी छेडछाड करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, या दरम्यान काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना आपल्या ताब्यात घेतले. कल्याण जीआरपी आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करीत आहे.

2) भाजप नेत्याने बसमध्ये तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप

माजी भाजप नेता रविंद्र बावनथाडे याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

27 जुले 2017 रोजी नागपूरला जात असताना बावनथाडे याने माझ्यावर जबरदस्ती केली, असा पीडितेचा आरोप होता. बसमधील कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ समाज माध्यामांवर व्हायरल झाल्यानंतर पीडितेची तक्रार नोंदवण्यात आली होती.

या प्रकरणानंतर भाजपने माहिती देत बावनथाडे याला काही महिन्यांपूर्वीच पक्षातून बाहेर काढल्याचे सांगितले.

बावनथाडे हा सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक असून व्हायरल झालेल्या व्हिडिओतील व्यक्ती तोच असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले होते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या घटनेचा निषेध केला होता. आरोपीवर कारवाई होत असून दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई होईल, असे ते म्हणाले होते.

3) यवतमाळ येथे 8 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार

वणी येथील एका शाळेतील 8 बालकांवर बसमध्ये लैंगिक अत्याचार घडल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बसचा चालक आणि क्लिनरला अटक करण्यात आली होती.

मुलांवर गेल्या एक महिन्यापासून अत्याचार होत असल्याचा दावा पालकांनी केला होता. पोलिसांनी दोन बसेस ज्यामध्ये चिमुकल्यांवर अत्याचार झाला, असा आरोप करण्यात आला होता, त्या जप्त केल्या होत्या. या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला होता.

4) नागपुरात एकाच रात्रीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर दोनवेळा बलात्कार

नागपुरात एकाच रात्री सहा नराधमांनी 17 वर्षीय गतिमंद मुलीवर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. ही घटना गुरुवारच्या (29 जुलै) रात्री ते शुक्रवारच्या (30जुलै) पहाटे घडली होती. दोन वेगवेगळ्या ठिकाणी नराधमांनी मदतीच्या नावाखाली तिच्यावर बलात्कार केला होता. सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार संशयितांना ताब्यात घेतले होते.

पहिल्यांदा घडलेल्या बलात्काराचा घटनाक्रम -

घटनेच्या दिवशी गुरुवारी (29 जुलै) पीडिता सायंकाळी नाशिकला जायचे म्हणून घरून निघाली आणि मानस चौकात पोहोचली. पण, नाशिकला जायला तिच्याजवळ ना पैसे होते, ना कसे जायचे हे तिला माहीत होते. यावेळी काही टवाळखोर छेड काढत असल्याचे पाहून एक ऑटोचालक तिला मदत करतो, असे म्हणाला. मदतीच्या नावावर तिला मोमिनपुरा टिमकी भागात राहत असलेल्या खोलीत नेले. त्या खोलीत चौघांनी पीडिता गतिमंद असल्याचा फायदा घेतला.

दुसऱ्यांदा झाला बलात्कार -

त्यानंतर पहाटे तिला खोलीमधून एकाने मेयो हॉस्पिटलजवळ सोडले. यावेळी पुन्हा दोघांनी एकटी असल्याचे हेरले. पण, यात सोडून देणारा आणि दोघांची ओळख असल्याचा संशय असून तपास सुरू आहे. यावेळी दोघांनी मोमीनपुरा मार्गावर असलेल्या मेट्रोच्या पुलाखाली उभा असलेल्या एका ऑटोत तिच्यावर दुसऱ्यांदा आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर शुक्रवारच्या पहाटे त्याच भागात सोडले. अशा पद्धतीने सहा जणांनी तिच्यावर अत्याचार केला.

पीडिता पोहचली रेल्वे स्टेनवरून बालगृहात -

पीडित गतिमंद असल्याने सुरुवातीला घाबरलेली होती. तिने नाशिकला जायचे आहे आणि पैसे नाही, असे मदतीला आलेल्या काहीना सांगताच, तिची परिस्थिती पाहून जवळच असलेल्या रेल्वे स्टेशनला तिला नेले. यावेळी तिला स्वतःच्या खर्चाने नाशिकचे तिकीट काढून दिले. पण यावेळी स्टेशनवर ती रडत असताना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना दिसली. यामुळे तिला रेल्वे जीआरपीच्या मदतीने काही बोलत नसल्याने किंवा आपबीती सांगू शकत नसल्याने चाईल्ड लाईनच्या मदतीने तिला बालगृहात नेण्यात आले.

घटनेनंतर दोन दिवसाने सांगितली आपबीती -

विचारपूस केली असता तिने आपबीती बालगृहाच्या अधीक्षक यांना सांगितली. यावेळी तिचा जवाब नोंदवण्यात आला.

हेही वाचा - चिपी विमानतळाचे उद्घाटन; नाव न घेता मुख्यमंत्री आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

Last Updated : Oct 9, 2021, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.