ETV Bharat / bharat

SC Hearing on Shivsena : शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष कोणाचा? सुनावणी दोन मिनिटात होऊ शकत नाही - सर्वोच्च न्यायालय

शिवसेना हा पक्ष आणि पक्षाचे (Shivsena Political Crisis) चिन्ह कोणाचे याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी दोन मिनिटात होऊ शकत (Shivsena Name Symbol Hearing) नाही, असे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवले (SC Hearing on Shivsena Crisis) आहे. थोडक्यात ही सुनावणी ताबडतोब घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

Shivsena Controversy
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद
author img

By

Published : Aug 1, 2023, 5:46 PM IST

Updated : Aug 1, 2023, 6:02 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रात जून 2022 मधील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्ष कोणाचा आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचे याबाबतची (Shivsena Political Crisis) याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या संदर्भातील सुनावणीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने (Shivsena Name Symbol) मुद्दा मांडताना वकिलांनी 370 कलमाचा संदर्भ मांडला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या (SC Hearing on Shivsena Crisis) सत्तासंघर्षाबाबत सुनावणी होईल असे म्हटले होते. त्याबाबत वकिलांनी संदर्भ देताच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी टिप्पणी केली की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी दोन मिनिटात होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.

काय आहे प्रकरण - जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष फोडला. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण यावर शिंदे गटाने दावा केला. तो भारतीय निवडणूक आयोगाने मान्य केला. निवडणूक आयोगाच्या त्या निकालाला आणि निर्णयाला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी 370 कलमबाबत सुनावणी झाल्यानंतर शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत सुनावणी होईल हे स्पष्ट केले होते.

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण - यासंदर्भात नियमानुसार नवीन पक्षाची घटना ही निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर अद्यापही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आधीची उपलब्ध असलेली घटना आणि नंतरची घटना म्हणजे दोन्ही पक्षांच्या घटना एक समान अभ्यासता येतील, असे स्पष्टीकरण सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने दिले आहे.

निवडणूक आयोगाचा निकाल - शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारीला याप्रकरणी निकाल दिला होता. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला होता. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

हेही वाचा -

  1. Sharad Pawar Retirement : शरद पवार 'या' महिन्यात राजकारणातून होणार निवृत्त? पण...
  2. Political Crisis In NCP : निवडणूक आयोगात अजित पवार गट भक्कम बाजू मांडणार
  3. Maharashtra Politics Crisis : राष्ट्रवादी कुणाची? काकांची की पुतण्याची; केंद्रीय निवडणूक आयोगाची दोन्ही पवार गटांना नोटीस

Last Updated : Aug 1, 2023, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.