कोरोना प्रादुर्भावाच्या काळात सर्वच शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी होते. आशात आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून सरकारने प्रयत्न केले. आशावेळी काय अडचणी आल्या. येथून पुढे त्या येऊ नये, म्हणून काय उपाय करण्यात आले, असा सवाल शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी लोकसभेत उपस्थित केला. तसेच कोरोना काळात घेण्यात आलेल्या परिक्षा ऑनलाईन होत्या. यादरम्यान विद्यार्थ्यांना सामना कराव्या लागलेल्या अडचणींवर येत्या काळात काय उपाय काढण्यात येतील जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणार नाही, हाही सवाल त्यांनी लोकसभेत केला.
तर 2022 पर्यंत आदिवासी क्षेत्रामध्ये 750 एकलव्य निवासी शाळा स्थापन निर्धार सरकारचा आहे. एकलव्य निवासी शाळाप्रमाणे देशातील अनेक संस्था आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी काम करत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी आशा संस्थांच्या नेटवर्कचा फायदा घेत आपण त्यांना मदत करू शकतो, असाही प्रश्न त्यांनी लोकसभेत मांडला.