मुंबई - पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ( Bhagwant Mann on Pension ) यापुढे आमदारांना एकदाच पेन्शन दिले जाईल अशी घोषणा केली आहे. तुम्ही कितीही वेळा आमदार व्हा, पेन्शन एकदाच दिली जाईल. या विषयी ईटीव्ही भारतने राज्यातील आमदारांची ( Maharashtra MLAs on new pension rule ) प्रतिक्रिया जाणून घेतली आहे.
पंजाबमध्ये आप सरकारने पेन्शनवर मर्यादा ( new pension rule in Punjab ) लागू केली आहे. महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती बघता सरसकट आमदारांची स्थिती वेगळी असल्याचे आमदारांनी सांगितले. भाजप आमदार जयकुमार रावल ( BJP MLA Jaykumar Raval ) म्हणाले, की सर्वच आमदार श्रीमंत असतात असे नाही. एखाद्या आमदाराला तीन ते पाच लाख लोकांमधून निवडून यायला बरेच कष्ट सहन करावे लागतात. अशा परिस्थितीत पुढच्यावेळी तो पुन्हा निवडून येईल की नाही याची शाश्वती नसते. अशात पुन्हा जरी निवडून आला नाही तरी जनतेकडून त्यांना अपेक्षा असतात. त्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निधी लागतो. शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे म्हणाले, की अनेक लोकप्रतिनिधींची अवस्था चांगली असते. त्याच्यामुळे सरसकट हा निर्णय लागू होत नाही. ज्यांना पेन्शन घ्यायची नाही, त्यांनी घेऊ नये.
हेही वाचा-MLAs Pension in Punjab : आमदाराला एकदाच मिळणार पेन्शन- पंजाबच्या आप सरकारचा निर्णय
आम आदमी सरकारने हा घेतला निर्णय
पंजाबच्या आम आदमी सरकारने आमदारांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय ( big announcement on MLA Pension ) घेतला आहे. एखादा नेता एकापेक्षा जास्त वेळा आमदार निवडून आला असला तरी, त्याला फक्त एकदाच पेन्शन मिळणार आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, आतापर्यंत प्रत्येक वेळी कोणी आमदार झाला की पेन्शनची रक्कम जोडली जायची. त्यामुळे अनेक आमदारांना लाखो रुपये पेन्शन मिळत असे. यासोबतच भगवंत मान यांनी राज्यातील बेरोजगारीचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, पदवी असलेले तरुण जेव्हा नोकरीसाठी जातात तेव्हा त्यांच्यावर लाठीमार केला जातो. आता सरकारकडून तरुणांना नोकऱ्या देण्याची तयारी करण्यात येणार आहे.
हेही वाचा-MH MPs in Parliament : नवनीत राणांनी एनएसईमधील भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न केला उपस्थित