मुंबई - रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. तर युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील 1200 विद्यार्थी ( Maharashtra students stuck in Ukraine ) शिक्षणासाठी गेल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणावे, अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पाठवले आहे.
![Maharashtra minister urges Modi to ensure safe return of 1,200 Maharashtra state students stuck in Ukraine](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14566492_nana.jpg)
रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारले आहे. संपूर्ण जगात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहे. युक्रेनमधील नागरिक जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. तर दुसरीकडे 74 लष्कर अड्डे उध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला आहे. जगभरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून परदेशी शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी मदतीसाठी याचना करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील युक्रेनमधील विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी मुख्य सचिव विभागाने केंद्राशी समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने युक्रेनमध्ये 1200 विद्यार्थी अडकले असल्याचे म्हटले आहे. तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सुखरूप आणावे, अशी विनंतीही मंत्री सामंत यांनी केली आहे.
![Maharashtra minister urges Modi to ensure safe return of 1,200 Maharashtra state students stuck in Ukraine](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_25022022144404_2502f_1645780444_1103.jpg)
![Maharashtra minister urges Modi to ensure safe return of 1,200 Maharashtra state students stuck in Ukraine](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/_25022022144404_2502f_1645780444_995.jpg)