ETV Bharat / bharat

Todays Top News : राष्ट्रपती घेणार नौदलाच्या अध्यक्षीय ताफ्याचा आढावा यासह वाचा महत्त्वाच्या टॉप न्यूज एका क्लिकवर - Tourism Minister Aditya Thackeray

Todays Top News : आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

Todays Top News
राष्ट्रपती
author img

By

Published : Feb 21, 2022, 6:02 AM IST

Updated : Feb 21, 2022, 6:59 AM IST

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

आज 'या' घडामोडींवर असेल विशेष नजर -

  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे विशाखापट्टनम येथील नौदलाच्या अध्यक्षीय ताफ्याचा आढावा घेणार आहेत. यासाठी ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी संध्याकाळी विशाखापट्टणमला आलेले आहेत.
  • केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारमण आज मुंबईत येणार आहेत. यावेळी त्या महाराष्ट्रातील भागधारक, उद्योग आणि व्यापाराशी संबंधित मोठे करदाते आणि निवडक व्यावसायिकांशी संवाद साधणार आहेत.
  • पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे दोन दिवशीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते विविध विकास कामांचा आढावा घेणार आहेत. सविस्तर वाचा...
  • किरीट सोमैया हे मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
  • आज आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आहे.

कालच्या महत्त्वाच्या बातम्या -

  • मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना सुमारे ४,००० पोस्टकार्ड असलेले कुरिअर केले ( CM Uddhav Thackeray sends postcards to President ) आहे. त्यांनी हे पोस्टकार्ड पाठवून मराठीला 'अभिजात भाषेचा' दर्जा देण्याची मागणी केली आहे. पोस्टकार्डचा हा दुसरा टप्पा होता. पहिल्या वेळी 6,000 पोस्टकार्डचा एक कुरिअर याच प्रस्तावासाठी पाठवण्यात आले होते. राज्यभरातील सेलिब्रिटीं ते सर्वसामान्य लोकांसह गेल्या काही महिन्यांत राष्ट्रपतींना 125,000 हून अधिक पोस्टकार्ड पाठवले आहेत. सविस्तर वाचा...
  • मुंबई : देशासमोर आज अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी आज आम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर ( Telangana CM K Chandrashekhar Rao ) यांच्याशी चर्चा केली. आजची बैठक ही राजकीय बैठक न म्हणता विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करणारी बैठक असल्याचे शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांनी सांगितले. विकासाच्या मुद्द्यांवर जे कोणी पक्ष एकत्र येते त्यांना सोबत घेण्याचा विचार आहे. त्यासाठी पुढील बैठकीत अधिक चर्चा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा...
  • मुंबई : देशात सध्या राजकीय वातावरणात बदलत होत चालले आहेत. राज्यकारभार दूर राहिला, सूडाच राजकारणात अत्यंत खालच्या पातळीचे केले जातेय. सुडाचे राजकारण ही आमची संस्कृती नाही, असे हिंदुत्व तर अजिबातच नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला टोला लगावला. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ( Telangana CM K Chandrashekhar Rao ) यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) त्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन जवळपास सव्वा तास देशाच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा ( KCR Thackeray Meet ) केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी के कविता, पल्ला राजेश्‍वर रेड्डी, रणजीत रेड्डी, बीबी पाटील, जय संतोष राव आणि खासदार संजय राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री सुभाष देसाई, आदी मंडळी उपस्थित होती. पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. सविस्तर वाचा...
  • मुंबई - प्रतिष्ठित दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022 ( Dadasaheb Phalke International Film Festival Awards 2022 ) रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदानाबद्दल पुरस्कार मिळाला. अभिनेता रणवीर सिंगला '83' मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर 'मिमी'साठी कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सविस्तर वाचा...
  • कोल्हापूर - राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर ( Tourism Minister Aaditya Thackeray on Kolhapur tour ) आहेत. काल रविवारी दुपारी शिरोळ मधल्या नृसिंहवाडी येथील श्री दत्ताचे दर्शन घेतल्यानंतर रात्री उशिरा ते कोल्हापुरात पोहोचले. कोल्हापुरात येताच त्यांनी रात्री 11 वाजता रंकाळा तलावाला भेट ( Aaditya Thackeray Visit Rankala Lake ) दिली आणि संपूर्ण आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार राजेश क्षिरसागर आदी उपस्थित होते. सविस्तर वाचा...
  • गुजरात (पोरबंदर) - पाकिस्तानचे नापाक कृत्य पुन्हा एकदा समोर आले आहे. काल शनिवार (दि. 20 फेब्रुवारी) रोजी पाकिस्तान सागरी सुरक्षा दलाने 5 बोटींसह 30 मच्छिमारांचे अपहरण केल्याची बातमी समोर आली आहे. पोरबंदर, वनाकबारा, ओखा 1, आणि 2 मंगरूळ (गिर सोमनाथ) या अपहरण झालेल्या नौकांचा समावेश आहे. सविस्तर वाचा...

जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य -

Last Updated : Feb 21, 2022, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.