देहरादून - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी उत्तराखंडमधील त्यांच्या नामटी चेटाबगड या मूळगावी पोहोचले. गावातील लोकांनी राज्यपाल भगतसिंह यांचे भव्य स्वागत केले. प्रशासनाने त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिले. अजून शिक्षण झाले असते, तर पंतप्रधान झालो असतो, असे त्यांनी मिश्किलपणाने सांगितले.
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, की भगवती कृपा आणि जनतेच्या आशिर्वादाने विविध पदावर तसेच मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली आहे. नैनीतालमधून लोकसभेत संधी मिळाली. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याची संधी मिळाली आहे. महिलांनी आपली संस्कृती वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी पारंपरिक कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा-भाजपशासित राज्यांकडूनही इंधन दरकपात, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती दर?
नेता होण्यामध्येही खूप मोठी मेहनत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. ते म्हणाले की गावातन पिथौरागडपर्यंत पायी गेलो आहे. आई-वडिलांनी शेती करून शिकविले आहे. डोंगरी भागातही शेती करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेता मिळणे ही नशिबाची गोष्ट आहे. नेता होण्यासाठीही खूप मोठी मेहनत असते. त्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तयार व्हावे लागते. नेत्यांना कधी फुलांची माळा तर कधी चप्पलांच्या हारा मिळतात. त्यांनी संपूर्ण भाषण हे बागेश्वरीच्या स्थानिक भाषेत केले.