लखनऊ (उत्तर प्रदेश) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आहेत. या दौऱयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अयोध्येत जोरदार स्वागत करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रभु रामाचे दर्शन घेतले. तसेच, शरयू नदी पात्रात पुजा करून तेथे आरतीही त्यांनी केली. त्यानंतर रात्री उशिरा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट झाली. यावेळी आदित्यनाथ यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. तसेच, त्या दोघांमध्ये बराचवेळ बंद दाराआड चर्चाही झाली आहे.
-
#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde meets UP CM Yogi Adityanath in Lucknow. pic.twitter.com/UsJmgWjqwI
— ANI (@ANI) April 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde meets UP CM Yogi Adityanath in Lucknow. pic.twitter.com/UsJmgWjqwI
— ANI (@ANI) April 9, 2023#WATCH | Maharashtra CM Eknath Shinde meets UP CM Yogi Adityanath in Lucknow. pic.twitter.com/UsJmgWjqwI
— ANI (@ANI) April 9, 2023
अयोध्येशी जिव्हाळ्याचे नाते - अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि रामभक्त यांची इच्छा आहे. शिवसेना आणि अयोध्या यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्याकडून सहकार्य मिळणे, ही अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यात रावणराज सुरू असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासूनच आम्ही काम करत आहोत. त्यामुळे त्यांच्या टीकेला कामांतून चोख उत्तर देऊ, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
भाजपचे नेते सहभागी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मुंबई विमानतळावरुन अयोध्येसाठी उड्डाण केले होते. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात शिवसेना आणि भाजपचे नेते सहभागी झाले आहेत. भाजप नेते संजय कुटे, राम शिंदे, गिरीश महाजन देखील अयोध्येला रवाना झाले होते
स्पेशल रेल्वे अयोध्येत दाखल - मागील महिन्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला होता. 9 एप्रिल रोजी सकाळी शिंदे हे अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यावरून बरीच राजकीय चर्चा राज्यात झाली. शुक्रवारीच ठाण्यातून विशेष रेल्वे कार्यकर्त्यांना घेऊन अयोध्येसाठी रवाना झाली होती. त्या रेल्वेत जवळपास 3 हजार शिवसैनिक अयोध्येसाठी रवाना झाले होते.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शरयू नदीची महाआरती अन् पूजा; पाहा व्हिडिओ