मुंबई राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे.
Breaking News Live : नवीन शिक्षण धोरणाच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष मुख्यमंत्री तरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदस्य - आजच्या ताज्या बातम्या
17:37 September 20
नवीन शिक्षण धोरणाच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष मुख्यमंत्री तरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदस्य
16:02 September 20
चाइल्ड पोर्नोग्राफी व्हिडिओबाबत ट्विटर इंडिया प्रमुखांची होणार चौकशी
चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आले होते. ते 20 रुपयांना विकले गेले होते. ट्विटरने अद्याप ते हटवलेले नाही आणि त्याची पुढील तक्रार केली. आम्ही ट्विटर इंडियाच्या प्रमुखाला बोलावून अहवाल मागवला आहे. आम्ही दिल्ली पोलिसांनाही बोलावले आहे आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे, असे दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी सांगितले.
15:11 September 20
उमेश कोल्हे हत्याकांडात एनआयएला आरोप पत्र दाखल करण्याकरिता मिळाली मुदतवाढ
मुंबई सत्र न्यायालय विशेष एन आय ए कोर्टाने एनआयएला 90 दिवसाची वाढीव वेळ दिला आहे. उमेश कोल्हे हत्याकांडात आज एनआयएला आरोप पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती
13:16 September 20
मुख्यमंत्री उद्यापासून दोन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर
मुंबई - राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते. दरम्यान रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार, पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या आणि राज्यातून गुजरातला गेलेला वेदांता प्रकल्पामुळे सरकार गोत्यात आले आहे. त्यामुळे नवे उद्योगधंदे, प्रकल्प आणण्याबाबत दिल्ली स्तरावर भेटीगाठी घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
12:51 September 20
दसरा मेळाव्यासाठी शिवसेना जाणार न्यायालयात
मुंबई - काही दिवसावर दसरा येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर ( Shivaji Park Ground ) दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. आतापर्यंत शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेकडे ( Brihanmumbai Municipal Corporation ) दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेण्याबाबत तीन वेळा पत्र दिल आहे. मात्र अद्यापही महानगरपालिकेकडून याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने, शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
12:51 September 20
मुंबई विमानतळावरून २४ तासांत १ लाख ३० हजार प्रवाशांनी केला प्रवास.. विक्रम मोडला
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वतःचाच विक्रम मोडला Mumbai airport handles record number of passenger आहे. याठिकाणी १७ सप्टेंबर रोजी २४ तासांमध्ये तब्बल १ लाख ३० हजार इतकी प्रवासी वाहतूक हाताळली आहे.
12:50 September 20
शिक्षकांचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे; पालकांनी दिला चोप
अहमदनगर, शिर्डी : शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेत 7 वी व 8 वी वर्गातील अनेक अल्पवयीन विद्यार्थीनीना मोबाईलवरून ( Minor Students of Zilla Parishad School in Shirdi ) दोन शिक्षक अश्लील व्हिडीओ दाखवत त्यांच्याशी गैरवर्तन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यांना विद्यार्थी गुरू मानतात त्याच शिक्षकरूपी गुरूंच्या या कृत्यामुळे शिर्डीत असंतोषाची लाट उसळली असून, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या शिक्षकांना चांगलाच चोप ( Parents of Students Gave Good Slap to Teachers ) दिला. ह्या बातमीची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांची फौज शाळेत दाखल होऊन ( Ahmednagar Shirdi Sexual Harassment Case ) आरोपी शिक्षकांना ताब्यात घेतले.
11:25 September 20
नारायण राणे यांना उच्च न्यायालयाचा दणका; जुहूमधील बंगल्याचे बांधकाम बेकायदा प्रकरणाची याचिका फेटाळली

जुहू येथील अधीश बंगल्याच्या बेकायदा बांधकाम निर्मिती करणारी याचिका फेटाळली
भाजप नेते नारायण राणे यांच्या मालकीच्या कंपनीने जुहू येथील त्यांच्या आठ मजली बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या दुसऱ्या अर्जावर विचार करण्यासाठी बीएमसीला निर्देश देण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली
10:09 September 20
राज ठाकरे दोन दिवसीय चंद्रपूर दौऱ्यावर; संघटना बांधणीबाबत होणार निर्णय
चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दीवसीय दौऱ्यासाठी चंद्रपूरात आलेले आहेत. काल रात्री उशिरा त्यांचे चंद्रपूर शहरात आगमन झाले. जिल्ह्याच्या सुरुवातीपासूनच त्यांचा ठिकठिकाणी सत्कार आणि स्वागत करण्यात आले. सर्वात आधी शासकीय विश्रामगृहात येऊन त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यानंतर ते मुक्काम असणाऱ्या एनडी हॉटेलमध्ये गेले. आज देखील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. या दरम्यान पक्षात मोठे बदल करण्याचे संकेत मिळत आहे. हा फेरबदल नेमका कोणता होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
09:50 September 20
पुराच्या पाण्यामुळे अंत्यविधीसाठी लागले आठ तास, गावकऱ्यांनी पाण्यातून आणला मृतदेह
औरंगाबाद (सोयगाव) - जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बऱ्याच ठिकाणी गाव, तांडा आणि शेत वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. अशीच काही परिस्थिती सोयगाव तालुक्यातील वरठाण परिसरात पाहायला मिळाली. या भागात एवढं पाऊस झाला की शेतात राहणाऱ्या एका महिलेचा मृतदेह गावात आणण्यासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर गावकरी आणि महिलेच्या काही नातेवाईकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह गावात आणण्यात आला.
09:44 September 20
मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारा माणूस; डूप्लिकेट सीएम विजय माने यांचे स्पष्टीकरण
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसणारा डुप्लिकेट सीएम नावाने प्रसिद्ध झालेले विजय माने हे आता अडचणीत सापडले आहेत. सराईत गुन्हेगार मोहोळ याच्यासोबत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्याच्या बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
09:40 September 20
सातारा जिल्ह्यातील सहापैकी प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींवर शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व
सातारा - जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतींच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंना प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर आपल्या गटाची सत्ता आणण्यात यश आले आहे.
09:40 September 20
हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीरवर हल्ला प्रकरणी 3 पोलीस कर्मचारी निलंबित
पुणे - 5 सप्टेंबरला हिंदू राष्ट्र संघटनेचा अध्यक्ष तुषार हंबीरवर ससून रुग्णालयामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. रुग्णालयात हंबीरला बंदोबस्तासाठी नेमलेले पोलिस पोलीस शिपाई पांडुरंग भगवान कदम, पोलीस शिपाई राहुल नंदू माळी आणि सिताराम अहिलू कोकाटे या कोर्ट कंपनीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी निलंबित केलं आहे
08:11 September 20
आजपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 मालिकेला सुरुवात
India vs Australia 1st T20 : टी20 क्रिकेटमधील दोन अव्वल दर्जाचे संघ असणारे भारत आणि ऑस्ट्रेलिया आजपासून तीन टी20 सामन्यांची मालिका खेळत आहेत. आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया येथे 26 ऑक्टोबरपासून रंगणार असल्याने या स्पर्धेपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासाठी ही मालिका एकप्रकारची रंगीत तालिम असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ (Team Australia) भारतात सामने खेळण्यासाठी आला असून आज (20 सप्टेंबर) ते 25 सप्टेंबर दरम्यान हे सामने रंगणार आहेत.
08:11 September 20
दसरा मेळावा परवानगीवरून शिवसेना आक्रमक; आज पालिका अधिकाऱ्यांची घेणार भेट
मुंबई - शिवसेनेचे शिष्टमंडळ आज दसरा मेळावा परवानगीसाठी जी नॉर्थ वॉर्डमध्ये धडकणार आहे. यावेळी जी नॉर्थ वॉर्डमध्ये अधिकाऱ्यांची शिवसेना शिष्टमंडळ भेट घेईल. यावेळी महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे परवानगी मिळाली नाही, तर शिवसेना हायकोर्टात जाणार आहे. दरम्यान, हायकोर्टातूनही परवानगी मिळाली नाही, तर शिवाजी पार्कमध्ये घुसून दसरा मेळावा करण्याच्या तयारीत शिवसेना असल्याचंही सांगितलं जातंय.
07:16 September 20
महिलांचे बजेट कोलमडले; आज भाज्यांच्या दरात मोठी वाढ
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे शेपूच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली (Today Vegetables Rate) आहे. मेथीच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात २ ते अडीच हजारांची वाढ झाली (Today Vegetables Price) आहे. १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात १८०० रुपयांनी वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांनी वाढ झाली (APMC Market Vegetables Rate 20 September 2022) आहे.
07:15 September 20
शासकीय लॉ कॉलेजमधील त्या आठ विद्यार्थ्यांचा मुंबई विद्यापीठाने निकाल केला जाहीर; उच्च न्यायालयातून याचिका निकाली
मुंबई - मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधील तिसऱ्या वर्षांमधील असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये निकाल गहाळ झाल्यामुळे मुंबई विद्यापीठाविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी मुंबई विद्यापीठाच्यावतीने वरिष्ठ वकील आशुतोष कुलकर्णी यांनी असे सांगितले की विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत त्यांना हार्ड कॉपी देखील निकालाची देण्यात येणार आहे. यानंतर न्यायालयाने याचिका निकाली काढली आहे.
06:49 September 20
शासकीय कामासाठी चार्टर प्लेनचा उपयोग; माजी मंत्री नितीन राऊत यांचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र
मुंबई - राज्याचे माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी कोरोना काळामध्ये वैयक्तिक कामासाठी चार्टर प्लेनचा वापर केला होता. या प्रवासामध्ये राज्य वीज कंपन्यांचे 40 लाख रुपये बेकायदेशीररित्या वापरल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान नितीन राऊत यांनी असे सांगितले की, कोणत्याही वैयक्तिक कामासाठी नाही तर अधिकृत शासकीय कामासाठी चार्टर प्लेनचा वापर केला होता.
06:49 September 20
युनियन बँक घोटाळा, शाखा व्यवस्थपकासह चौघांना अटक
अमरावती - युनियन बँकेतील लॉकर्समध्ये तब्बल ५४०० ग्रॅम बनावट सोने आढळल्याप्रकरणी सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेने बॅंकेच्या तत्कालिन शाखा व्यवस्थापकासह चार जणांना अटक केली. पोलीस कोठडीदरम्यान, या घोटाळ्याची व्याप्ती उघड होणार असून, आरोपींची संख्या वाढण्याचे संकेत तपास यंत्रणेने दिले आहेत. शहरातील काही सुवर्णकार देखील पोलिसांच्या रडारवर आहेत.
06:39 September 20
Maharashtra breaking news : नवीन शिक्षण धोरणाच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष मुख्यमंत्री तरउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सदस्य
मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे भाऊ उद्योगपती अनिल अंबानी यांनी फेब्रुवारी 2017 मध्ये देना बँकेकडून 250 कोटींचं अल्पकालीन कर्ज घेतलं होतं. बँकेने वारंवार कर्ज फेडण्याची लेखी सूचना देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने बँकेतर्फे बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयात अनिल अंबानी आणि पुनीत गर्ग यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे आता कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.