ETV Bharat / bharat

Breaking News Live : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात अव्वल - आजच्या ताज्या बातम्या

maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Sep 24, 2022, 6:32 AM IST

Updated : Sep 24, 2022, 11:08 PM IST

23:07 September 24

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात अव्वल

कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा एकदा देशपातळीवर यश मिळवत पहिल्या पाच क्रमांकात बाजी मारली आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्येच्या गटात कराड पालिका अव्वल आली आहे. पाच नगरपालिकांना दि. १ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

16:32 September 24

तामिळनाडू : आरएसएस नेत्याच्या घरावर फेकला पेट्रोल बॉम्ब

तामिळनाडू : आरएसएस नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला

13:24 September 24

चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयची देशभरात 20 राज्यांत छापेमारी सुरू

मुंबई : इंटरपोलच्या इनपुटनंतर सीबीआयची भारतभर मोठ्या प्रमाणावर छापेमारी सुरू झाली आहे. चाइल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी ही छापेमारी मुंबई दिल्ली, बंगळुरू,पाटणासह 20 राज्यांमध्ये ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. Body:इंटरपोलच्या इनपुटनंतर सीबीआयची 20 राज्यांत 56 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. ऑनलाईन बाल लैंगिक शोषण म्हणजेच चाईल्ड पोर्नोग्राफी प्रकरणी ही करवाई सुरु आहे.

13:24 September 24

पीएफआयला समर्थन देणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करा - नितेश राणे

मुंबई - दहशतवादी आणि त्यांच्या देशविघातक कारवायांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयए, ईडी आणि एटीएसने महाराष्ट्रसह देशातील वेगवेगळ्या भागांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) १०६ कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची धरपकड केली. या प्रकरणी पुण्यामध्ये काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

12:30 September 24

आयटीआय विद्यार्थिनीचा न्यूड व्हिडिओ व्हायरल; ब्लॅकमेलिंगची धमकी

मध्य प्रदेश, भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चंदीगड विद्यापीठासारखे प्रकरण ( Bhopal MMS of ITI Govindpura ) समोर ( Case Like Chandigarh University ) आले आहे. गोविंदपुरा येथील सरकारी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे वॉशरूममध्ये कपडे ( Bhopal MMS of ITI Govindpura Girl ) बदलताना त्याच आयटीआयमध्ये शिकणाऱ्या सहकारी मुलांनी व्हिडिओ बनवला. त्यांनी पैशांसाठी आईला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. या संपूर्ण घटनेने दु:खी झालेली मुलगी घर सोडून गायब झाली होती. ही घटना 17 सप्टेंबरची आहे, पोलिसांनी याप्रकरणी आयटीआयमध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना आरोपी केले असून त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

12:30 September 24

PFI आंदोलनावेळी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

पुणे : पुण्यासह राज्यभरात एनआयएनएने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( Popular Front of India ) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने ( Popular Front of India Protests in Pune ) पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे ( Pakistan Zindabad slogans in Pune ) लावण्यात आल्याची तक्रार केली आहे. तसेच नितेश राणे यांनी या प्रकरणी चुन चुन के मारेंगे असे ट्विट केले आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पहायला मिळत आहे.

10:20 September 24

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या PFI च्या 60 ते 70 जणांवर गुन्हे दाखल

रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

10:16 September 24

सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांक घसरल्याने शेअर मार्केटमध्ये उतार; बाजारात अस्थिरता कायम

मुंबई : यूएस फेडरल रिझव्‍‌र्हच्‍या बेशिस्त स्‍टेप्‍शनने भावनांना खीळ घातल्‍याने आणि जागतिक अर्थव्‍यवस्‍थेच्‍या दृष्‍टीकोनाबद्दल चिंतेत भर पडल्‍याने भारतीय बाजाराने 23 सप्‍टेंबर रोजी तिसर्‍या दिवशी तोटा ( Indian Market Extended Losses ) वाढवला. सर्व क्षेत्रांमध्ये जोरदार विक्री आणि रुपया नवीन नीचांकी पातळीवर घसरल्याने बाजाराने या वर्षातील सर्व नफा काढून ( Today Share Market Update ) टाकला. बंद होताना सेन्सेक्स 1,020.80 अंकांनी किंवा 1.73 टक्क्यांनी घसरून 58,098.92 वर आणि निफ्टी 302.50 अंकांनी किंवा 1.72 टक्क्यांनी घसरून 17,327.30 वर ( Aggressive Monetary Policy Action by Central Banks ) होता.

10:15 September 24

युती झाली तर करू, नाही तर एकटे लढू - दिलीप वळसे पाटील

नागपूर - आगामी निवडणुकांमध्ये विदर्भात राष्ट्रवादीला चांगला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असते. त्या-त्या ठिकाणच्या स्थिती प्रमाणे निर्णय होईल. आघाडीचे प्रयत्न करू,न झाल्यास आम्ही एकट्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना ( Elections to local bodies ) सामोरे जाऊ असं वक्तव्य केलं आहे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) यांनी केले आहे. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वळसे पाटील राष्ट्रवादीचा प्रभारी म्हणून कार्यकर्त्यांच्या तयारीचा आढावा घेतला.

10:15 September 24

दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याचे आव्हान

मुंबई - शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा? या वादावर न्यायालयाने पडदा टाकला आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेची शिवाजी पार्क तर शिंदे गटाची सभा बीकेसी मैदानात होणार आहे. अवघ्या दहा दिवसांवर दसरा आल्याने गर्दी जमवून मैदान भरगच्च करण्याचे टार्गेट आता दोघांपुढे असेल. यंदा शिवसेनेतील दोन गटात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे.

10:14 September 24

उद्या लोकलचा मेगा ब्लॉक

मुंबई - मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांत रविवारी मेगा ब्लॉक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि ठाणे या स्थानकांवर थांबून पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशीराने पोहोचेल.

10:13 September 24

मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसलेल्या सुप्रिया सुळे यांचा फोटो खोटा असल्याचा दावा

मुंबई - एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट केला. यावरून देखील आता पुन्हा राजकारण तापताना दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शितल म्हात्रे यांनी ट्विट केलेला फोटो हा खोटा असल्याचा दावा केला आहे.

08:33 September 24

भाजप नेत्याच्या मुलाला अटक; महिला कर्मचाऱ्याची हत्या

उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील 19 वर्षीय अंकिता भंडारी हत्या प्रकरणात भाजप नेते (BJP Leader) आणि माजी राज्यमंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य (Pulkit Arya) याला पोलिसांनी अटक केली आहे. पुलकितसोबत त्याचे आणखी दोन साथीदार अंकित उर्फ ​​पुलकित गुप्ता आणि सौरभ भास्कर यांनाही अटक करण्यात आली आहे.

08:33 September 24

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसला आता गांधी घराण्याबाहेरचा व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या दोन नाव चर्चेत आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरु होत असून ही प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरु असेल. त्यानंतर याबाबतच चित्रं अधिक स्पष्ट होईल.

07:09 September 24

ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे : महाराष्ट्रात पंचायतराज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे व त्याविषयीच्या कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याला प्राधान्य राहील. ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आपले राज्य व राज्यातील पंचायतराज संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

07:09 September 24

सैराट चित्रपटातील प्रिंन्सची भूमिका साकारणारा सुरज पवार राहुरी पोलिसांना शरण

अहमदनगर - नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याप्रकरणीच्या गुन्ह्यामध्ये सैराट चित्रपटातील प्रिन्सची भुमिका साकारणारा सुरज पवार पोलिसाच्या रडारवर होता. तो शुक्रवारी राहुरी पोलिसांना शरण आला असून, पोलिसांनी त्याचे तासभर जबाब नोंदविलेत. तर त्यास पुन्हा सोमवारी पोलीसात हजर राहण्याचे आदेश दिलेत.

06:26 September 24

खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण

नाशिक - महानगरपालिकेने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यावरती तात्पुरता मुरूम, खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सातत्याच्या पावसामुळे या खड्ड्यातील माती वाहून गेल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहने घसरून अपघाताच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे, तसेच खड्ड्यांमुळे वाहनांचे टायर फुटणे त्यासोबतच व्हील बैलेंसिंग सेटिंग, अलाइनमेंटचा नाहक आर्थिक भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतोय. असं असलं तरी महानगरपालिकेचे अधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात असा आरोप नागरिकांनी केला.

06:26 September 24

नागपूर टी-20 : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने दमदार विजय

नागपूर -दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतातीय संघाने जोरदार विजय मिळवला. पावसामुळे मैदान ओलं असल्याने सामना तब्बल अडीच तास उशिराने सुरू झाला. त्यामुळे मॅच प्रत्येकी आठ ओव्हरची खेळवण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा संघाने 5 गडी गमावून 90 धावा काढल्या. भारतीय संघाने चार बॉल शिल्लक असतानाच 91 धवांचे लक्ष प्राप्त करून मालिकेत एक- एकची बरोबरी साधली आहे.

06:15 September 24

MAHARASHTRA BREAKING NEWS - इंजिनिअरिंग विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी वर्गमित्रास अटक

नांदेड - विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने वसतिगृहातील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. घटनास्थळी पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट लागली असून, या चिठ्ठीत तिचा वाशिमचा प्रियकर वर्गमित्र आत्महत्येला कसा जबाबदार आहे याचा उल्लेख असल्याची माहिती होती. या प्रकरणी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या तिच्या वर्गमित्राला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना बुधवारी (दि.21) मध्यरात्रीस उघडकीस आली. गीता कल्याण कदम, वय 22 रा. उस्मानाबाद असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव होते.

Last Updated : Sep 24, 2022, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.