मुंबई- वादग्रस्त संघटना पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटनेच्या संबंधित पाच संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने आज एटीएस कस्टडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी एटीएस कडून त्यांची पुन्हा कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एटीएस कोर्टाने 3 ऑक्टोबर पर्यंत सर्व आरोपींची एटीएस कोठडीत रवानगी केली आहे
Breaking News Live : पीएफआय प्रकरणातील संशयित पाच आरोपींना 3 ऑक्टोंबरपर्यंत एटीएस कोठडी वाढ - महाराष्ट्र लेटेस्ट न्यूज टुडे
18:58 September 26
पीएफआय प्रकरणातील संशयित पाच आरोपींना 3 ऑक्टोंबरपर्यंत एटीएस कोठडी वाढ
18:57 September 26
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकील सतीश उके यांच्या जामीन अर्जावरील निकाल लांबणीवर
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांना नागपूर येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी कडून अटक करण्यात आली होती सतीश उके यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर आज न्यायालय निकाल देणार होते मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे हा निकाल 28 सप्टेंबर बुधवार रोजी देणार आहे त्यामुळे सतीश उके यांचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे.
18:56 September 26
सीना कोळेगाव धरण ओव्हर फ्लो धरणातून १० हजार १४० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू
सन 2007 मध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून 5.30 टी एम सी क्षमतेचा सीना कोळेगाव प्रकल्प उभारण्यात आला, हा प्रकल्प शेती सिंचनासाठी जीवनदायीनी ठरत आहे,
सध्या सीना कोळेगाव प्रकल्प अंतर्गत परंडा तालुक्यातील 6800 हेक्टर व करमाळा तालुक्यातील 3400 हेक्टर असे एकूण दहा हजार दोनशे हेक्टर जमीन क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे
सीना कोळेगाव प्रकल्पाची 150.49 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता आहे
18:56 September 26
पंतप्रधान मोदी आज रात्री टोकियोला रवाना होणार
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी आज रात्री टोकियोला रवाना होणार आहेत.
15:47 September 26
सातारा महामार्गावर कारचा भीषण अपघात, एअर बॅगमुळे वाचले चौघांचे प्राण
पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे.म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी..ही जी म्हण आहे ती आज खरी झालेली पाहायला मिळत आहे. पुणे - सातारा महामार्गावर भीषण अपघात झाला असून गाडी थेट डीव्हायडरला धडकली आणि थेट दुसऱ्या लेंनमध्ये शिरल्याची घटना समोर आली आहे. दुसऱ्या लेन मधून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे या वाहनातून प्रवास करत असलेल्या चौघांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. कारमधील एअर बॅग वेळीच उघडल्याने यातील प्रवाशांचे जीव वाचले आहेत. प्रवाशांचा मात्र एका क्षणाला काळजाचा ठोका तुटला.
15:34 September 26
रशियाच्या शाळेत गोळीबारात किमान सहा ठार
रशियाच्या शाळेत गोळीबारात किमान सहा ठार, सुमारे 20 जखमी झाले आहेत. हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे.
13:36 September 26
विलेपार्लेत ८ घरे कोसळली; जीवितहानी नाही
मुंबई - विलेपार्ले येथील इंदिरा नगर - २ मधील नाल्यालगत असलेली तळमजला अधिक एक मजली असलेली ८ घरे रविवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही. या दुर्घटनेला मेट्रोचे काम करणारे जे कुमार आणि कंत्राटदार कंपनी जबाबदार असल्याचा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक आमदार यांच्याकडे देखील यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
13:36 September 26
आमदार संतोष बांगर हल्ला प्रकरण; 11 शिवसैनिकांना अटक
अमरावती: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Shinde Group MLA Santosh Bangar) यांच्या वाहनावर रविवारी अंजनगाव सुर्जी येथे ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या (MLA Santosh Bangar vehicle attack) वतीने हल्ला चढविण्यात आला होता. या प्रकरणात आज पोलिसांनी 11 जणांना अटक केली आहे. (11 Shiv Sainiks arrested)
13:09 September 26
तानाजी सावंतांना रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल; राष्ट्रवादी आक्रमक
मुंबई : मराठा आरक्षण मुद्यावर बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घासरल्यानंतर त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. "मराठ्यांना आरक्षणाची "खाज सुटली" आहे", ( Marathas are Itching For Reservation ) असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या ( Tongue Rubbed while Talking on Maratha Reservation ) वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोंदवण्यात आला आहे. आरक्षण मागणे म्हणजे खाज आहे का? आरोग्य मंत्री हे मानसिक रोगी असून, सत्ता आणि संपत्तीचा माज असणाऱ्या तानाजी सावंत यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा तानाजी सावंत यांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण ( NCP leader Suraj Chavan has Warned ) यांनी दिला आहे.
13:09 September 26
अखेर मंत्री तानाजी सावंत यांनी मागितली माफी
पुणे - राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली. तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सत्तांतरण झाल्यानंतर सुटली, अशा शब्दांमध्ये सावंत यांनी विरोधकांना लक्ष्य केलं. यावर आत्ता विरोधकांकडून टीका होत आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तानाजी सावंत यांनी याप्रकरणी मराठा समाजाची माफी मागितली आहे.
12:09 September 26
शिवसेना वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्पावरून दिशाभूल करत आहे - भाजप
मावळ / पुणे- वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्पावरून राज्यात राजकारण रंगल आहे, दोन दिवसांपूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळमध्ये जनआक्रोश आंदोलनात सहभागी होऊन मोर्चा काढला, सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली, त्यालाच आज भाजपच्यावतीने उत्तर देत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, महाविकास आघाडीच्या काळातच वेदांता - फॉक्सकॉन प्रकल्प रखडल्याचा आरोप भाजपने केला. यावेळी गली गली मै शोर है! ठाकरे, पवार चोर है अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला,
10:39 September 26
गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांनाच प्रवेश दिला जावा, विश्व हिंदू परिषदेची मागणी
नागपूर - नवरात्र-गरबा उत्सवात आधार कार्ड तपासूनच प्रत्येकाला मंडपात प्रवेश द्या, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आली आहे. लव-जिहादसारख्या अप्रिय घटना टाळायच्या असतील तर आत्ताच काळजी घेतलेली बरी असा तर्क विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला आहे. गरबा उत्सवात श्रद्धा नसतानाही अनेक इतर धर्मीय प्रवेश करतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात. पुढे लव्ह जिहाद सारख्या समस्या निर्माण होतात. गरबा उत्सव हा श्रद्धेचा आणि उपासनेचा विषय आहे. तो सार्वजनिक इव्हेंट नाही, त्यामुळे गरबा आयोजनाच्या स्थळी फक्त हिंदू धर्मियांना प्रवेश दिला जावा,त्यासाठी प्रत्येकाचे आधारकार्ड तपासले जावे अशी सूचना विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात गरबा उत्सव आयोजन करणाऱ्यांना मंडळांना केली आहे.
09:44 September 26
अंबाबाई मंदिरात झाली घटस्थापना; नवरात्रोत्सवाला सुरुवात
कोल्हापूर : करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात पारंपारिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. सकाळी साडे आठ च्या सुमारास तोफेची सलामी देऊन नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर घटस्थापनेच्या धार्मिक विधीला सुरुवात होऊन अभिषेक आणि अन्य विधी पार पडले. दरम्यान, दुपारी 1 वाजल्यानंतर अंबाबाईची अलंकार पूजा बांधण्यात येणार आहे.
09:42 September 26
अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात स्फोट; एक नवजात बालक दगावले
अमरावती - जिल्हा सामान्य रुग्णालयातील ( District General Hospital Amravati ) बेबी केअर सेंटरमध्ये ( Explosion at baby care center ) रविवारी सकाळी दहा वाजता झालेल्या स्फोटामुळे ( Amravati District General Hospital blast ) एक बाळ दगावल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शॉर्टसर्किटमुळे बेबी केअर सेंटरमध्ये आग ( Fire in baby care center due to short circuit ) लागली होती. त्यावेळी सेंटरमध्ये 35 नवजार बालके होती. त्यातील एक बाळ धुरामुळे दगावल्याची घटना घडली आहे.
09:42 September 26
मेट्रोचे ८४ टक्के काम पूर्ण; जापान सरकारच्या प्रतिनिधींनी प्रकल्पाला दिली भेट
मुंबई - मेट्रो हा महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांशी योजना आहे. तर केंद्र शासनाच्या दृष्टीने कुलाबा ते वांद्रे सी मुंबई मेट्रो लाईन तीन हा भारताच्या आर्थिक राजधानीमधील महत्त्वाचा प्रकल्प देखील आहे. शासनाने या संदर्भात दावा केलाय की, 'जशी मुंबईची लोकल ही जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. तसेच 'मुंबई मेट्रो रेल्वे तीन' हे देखील एक नवीन वाहिनी होऊ शकते .आणि त्यासाठी धडाकेबाज रीतीने या शासनाने सर्व प्रकारच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे. या प्रकल्पाला जपान सरकारने मोठी मदत केली आहे .जापान सरकारच्या प्रतिनिधींनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली आणि आढावा घेतला.
09:41 September 26
दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक नवरात्रीसाठी सज्ज ; रोज ३० ते ४० हजार दांडीयाप्रेमी लावणार हजेरी
मुंबई : आजपासून दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांचा नवरात्री दांडिया उत्सव सुरू होत (Dandiya Queen Falguni Pathak) आहे. कोरोनाच्या २ वर्षाच्या गॅपनंतर आजपासून हा दांडिया जोरदार होणार (Navratri in Mumbai) आहे. दर दिवशी ३० ते ४० हजार दांडीयाप्रेमी याचा आनंद घेणार आहेत. यासाठी काल नवरात्रीच्या पूर्वसंधेला दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांनी रंगीत तालीम (Navratri Dandiya) केली. अडीच लाख स्क्वेअर फुटचा मंच खास यासाठी बांधण्यात आला आहे. या दांडियाचे आयोजक शिवा शेट्टी यांच्याशी खास बातचीत करत येथील आढावा ईटीव्हीचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी (Navratri festival 2022) घेतला.
09:41 September 26
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या किमती घसरल्या
मुंबई : सोमवारच्या सुरुवातीच्या व्यापारात 10 ग्रॅम पिवळा धातू (24-कॅरेट) 50,200 रुपयांवर ट्रेडिंगसह अपरिवर्तित राहिले. चांदी 56,300 रुपये प्रतिकिलोवर व्यवहार करीत आहे. दरम्यान, 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 46,000 रुपयांवर आहे. मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोने 50,200 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा ( Today Gold Silver Rate ) भाव अनुक्रमे 46,000 रुपये आहे. दिल्लीत 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 50,350 रुपये आणि 46,150 रुपये प्रति 10 ग्रॅम ( 26 Septembar 2022 Gold Silver Rates ) आहे.
08:22 September 26
नवरात्रीचा आज पहिला दिवस; मुंबा देवीची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा-आरती
मुंबई : चैत्र नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली ( Chaitra Navratri Started From Today ) आहे. आजपासून नऊ दिवस मंदिरांमध्ये आणि घरोघरी आई दुर्गामातेच्या नऊ वेगवेगळ्या शक्तिरूपांची पूजा ( Nine Different Forms of Goddess Durga will be Worshiped ) केली जाणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध मुंबा देवी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेची विशेष ( Mumba Devi Aarti Performed on First Day Navratri ) आरती करण्यात आली. आपणास सांगूया की यावेळी नवरात्रोत्सवाबाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
08:22 September 26
माजी खासदार प्रिया दत्त यांच्या कॅफेमध्ये चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना दोन वर्षाची कारावासाची शिक्षा
मुंबई - बॉलीवूड अभिनेता संजय दत्तची बहिण माजी खासदार प्रियंका दत्त यांच्या खार वर्सोवा येथील मॉमी जून कॅफेमध्ये मागील वर्षी दोन चोरांकडून चोरी करण्यात आली होती. तसेच कॅफेमधील मोबाईल आणि पैसे चोरण्यात आले होते. या आरोपींविरोधात खार पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली होती. बांद्रा महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना दोन वर्षाची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
08:22 September 26
एकनाथ खडसेंची घरवापसी अशक्य - अजित पवार
बारामती- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर चर्चा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पण, खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली त्यावर एकनाथ खडसे यांनी स्वतः खुलासा दिला आहे, त्यामुळे एकनाथ खडसेंची घरवापसी अशक्य असल्याचे अजित पवार म्हणाले.
08:22 September 26
अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात - मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
नांदेड - संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला असून मी प्रत्यक्ष फिरुन आढावाही घेत आहे. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
07:10 September 26
अनैतिक संबंधातून पत्नीने डॉक्टर पतीला टोचले भुलीचे इंजेक्शन, पत्नीविरोधात गुन्हा
नाशिक - दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध डॉक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करत वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने तिने हॉस्पिटलमध्येच डॉक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या म्हसरुळ येथील एका हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
06:26 September 26
तपासावरून लक्ष उडावं म्हणून पुण्यात PFI पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा - नीलम गोऱ्हे
पुणे - पाकिस्तान जिंदाबादच्या ज्या घोषणा दिल्या त्या घोषणा केवळ मूळ तपासावरून लक्ष इतरत्र वळावे यासाठी पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी सत्य समोर आणावं, जे काही चौकशी आहे तेीकरावी आणि पोलिसांनी सर्वच बाजूने जे काही घडले ते समोर आणावं, अशी मागणी नीलम ताई गोऱ्हे यांनी केली.
06:11 September 26
MAHARASHTRA BREAKING NEWS
पुणे - आदित्य ठाकरे सध्या नौटंकी करत आहेत. वेदांता प्रकल्प ज्या जागी होणार होता त्या जागी त्यांनी आंदोलन केलं. ती जागा तरी त्यांना माहिती होती का? ती जागासुद्धा दोन महिन्यांपूर्वी आम्ही दाखवली, त्यामुळे आदित्य ठाकरे नौटंकी करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली आहे.