ETV Bharat / bharat

Breaking News Live : अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात - मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील - आजच्या ताज्या बातम्या

maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Sep 25, 2022, 7:01 AM IST

Updated : Sep 25, 2022, 11:05 PM IST

23:05 September 25

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील लम्पी आजार नियंत्रणात - मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

- संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला असून मी प्रत्यक्ष फिरुन आढावाही घेत आहे. राज्यातील 30 जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले

23:04 September 25

अंजनगाव सुर्जी तणाव, शिंदे समर्थक शिवसैनिक रस्त्यावर

हिंगोलीचे आमदार आणि शिवसेनेचे नेते संतोष बांगर यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अंजनगाव सुर्जी येथे ठाकरे गटातील शिवसैनिकांनी हल्ला केल्याने आता शिंदे समर्थक शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला आहे.

23:04 September 25

एकनाथ खडसेंची घरवापसी अशक्य – अजित पवार

बारामती- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. पण, खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली त्यावर एकनाथ खडसे यांनी स्वतः खुलासा दिला आहे, त्यामुळे एकनाथ खडसेची घरवापसी अशक्य असल्याचे अजित पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, घरवापसी सारख्या बातम्या देणे यामध्ये कोणतेही तस्थ नाही. एकनाथ खडसेची घरवापसी बाबत त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. कोणतेही मंत्री अथवा कोणतेही लोकप्रतिनिधी कोणालाही कामानिमित्त भेटू शकतात. यामध्ये उद्या मी विरोधी पक्षनेता आहे, कामानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेलो, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटायला गेलो हे माझे काम आहे. अन्य मंत्र्यांना भेटलो तर आम्ही भेटू शकत नाही का? मी सरकारमध्ये असताना मी उपमुख्यमंत्री म्हणून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार मला भेटण्यासाठी येत होते. आम्ही ज्या पक्षातून निवडून येतो त्या पक्षाचे पदाधिकारी नसतो, संघटनेचा पदाधिकारी असतो. मात्र सरकारमध्ये ज्यावेळी संधी मिळते, त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधी असतात. याबाबत सर्वांनी जाणीव ठेवली पाहिजे, गैरसमज निर्माण करता कामा नये. राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये कोणीही नाराज नाही. आमचे नेते जे ठरवतात त्याप्रमाणे आम्ही सर्वजण काम करत असल्याचे पवार म्हणा

18:29 September 25

दोन वेगवेगळे व्हिडीओ आले असून त्यांची चौकशी केली जाईल-देवेंद्र फडणवीस

दोन वेगवेगळे व्हिडीओ आले असून त्यांची चौकशी केली जाईल. पण महाराष्ट्रात कोणी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आम्ही देशद्रोहाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील पीएफआय निदर्शनात ऐकू आलेल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

17:34 September 25

दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन करूनही सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले नाहीत- शरद पवार

शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर आंदोलन केले. पण सरकारने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. शेतकऱ्यांना एमएसपी देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते, परंतु ते दिले नाही. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले, परंतु ते पूर्ण केले नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

16:33 September 25

भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना जीव मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

पुणे- पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करून ५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

15:36 September 25

देवेंद्र फडणवीसांनी मला राजकीय भाष्य करण्यास मनाई केली आहे - एकनाथ शिंदे

नवी मुंबई - अडीच वर्षाचे सरकार आणि अडीच महिन्याचे सरकार यात फरक आहे. गेल्या अडीच वर्षात जे झालं नाही ते आम्ही अडीच महिन्यात केले. मी राजकीय भाष्य करणार नाही, तसे मला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मी जरी मुख्यमंत्री असलो तरी सोबत अनुभवी देवेंद्र फडणवीस आहेत असे सांगत न कळतपणे रिमोट फडणवीसांच्या हातात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी कबूल केले.

15:35 September 25

व्हायरल झालेल्या व्हिडिओंची चौकशी सुरू- पुणे पोलिसांची माहिती

बंड गार्डन येथे दंगल आणि रस्ता अडवल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओंची चौकशी सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती डीसीपी सागर पाटील यांनी दिली. पुण्यातील पीएफआयच्या निदर्शनात 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्यानंतर देशभरात संतप्तप भावना व्यक्त करण्यात येत आहे.

15:31 September 25

अफवा ठरत आहेत जीवघेण्या.. मुले चोरणारी समजून पोलिसांसमोरच महिलेला मारहाण

नाशिक मुलं चोर समजून एका महिलेला मारहाण केल्याची घटना सिडको राणा प्रताप चौकात घडली पोलिसांसमोर महिलेला धक्काबुक्की नाशिक शहरात दोन दिवसांत मुलं चोरण्याच्या संशयावरून मारहाणीची तिसरी घटना अशात मुलं चोरीच्या अफवेने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

14:57 September 25

आदिवासी विकास मंत्र्यांचे मजीतपूर येथील मुख्याध्यापकाला निलंबनाचे आदेश

गोंदीया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा मजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन निल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातील काही मुले प्रवासा दरम्यान बेशुद्ध देखील झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी नाराजी व्यक्त करत या शाळेच्या मुख्याध्यापला निलंबीत करण्याचे आदेश दिले आहे.

13:31 September 25

'पीएफआय' विरोधात मनसे आक्रमक

पुणे - पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्तांनी एनआयए टाकलेल्या छाप्याविरोधात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा,( Pakistan Zindabad slogans in Pune ) दिल्या होत्या. त्याविरोधा देशभरात प्रतिक्रिया उमटत आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आक्रमक पवित्रा घेतला असून ( MNS Protest PFI ) जोरदार निदर्शने ( MNS protest against Popular Front of India ) करण्यात येत आहे.

13:31 September 25

बेबी केअर सेंटरला आग लागल्याची समजताच नाना पटोले आले धावून

अमरावती - जिल्हास्तरीय रुग्णालयातील बेबी केअर सेंटरला आग (fire broke out at baby care center) लागल्याची माहिती मिळताच आज अमरावती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तातडीने धावून (Nana Patole baby care center) आलेत. पाच जिल्ह्यांसाठी एकच पालकमंत्री असल्याने कुठल्याही जिल्ह्याचा योग्य विकास आणि नियोजनात्मक कार्य होऊ शकत नाही, असे देखील नाना पटोले (Nana Patole In Amravati) म्हणाले.

12:30 September 25

युवासेना आक्रमक; पुण्यात पाकिस्तानी झेंडा फाडत आंदोलन

पुणे : तपास यंत्रणांनी पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्यावतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते.यावेळी आंदोलकांच्यावतीने केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावण्यात आल्याचा आरोप करण्यात येऊ लागला आहे. याच्या विरोधात आज युवा सेनेच्यावतीने ज्या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात आली त्याच ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याला जोडो मारत तो झेंडा फाडण्यात आला.

12:26 September 25

सुट्टीवर आलेल्या जवानाची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या

सातारा : सुटीवर आलेल्या व्याजवाडी (ता. वाई) येथील ( Jawan From Vayazwadi Commited Suicide ) जवानाने साताऱ्यातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. विजय सुदाम कुदळे (वय ३४, रा. अमरलक्ष्मी, प्रेरणा सोसायटी, सातारा) असे आत्महत्या ( Vijay Sudam Kudale Commited Suicide ) केलेल्या जवानाचे नाव आहे.

12:26 September 25

अमरावतीत बेबी केअर सेंटरला आग; धुरामुळे चिमुकल्यांची प्रकृती गंभीर

अमरावती - अमरावतीत बेबी केअर सेंटरला आग ( Amaravati Baby Care Center Fire ) लागली. परिणामी धुरामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या चिमुकल्यांची प्रकृती गंभीर बनली. जिल्हा महिला रुग्णालय येथील बेबी केअर सेंटर आहे. त्लाया सेटरला अचानक आग लागल्यामुळे खळबळ उडाली. अग्निशामन दलाने दोन पाण्याचया बंबाच्या सहाय्याने ही आग विझवली. बालकांना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे. धुरामुळे काही बालकांची प्रकृती गंभीर आहे.

10:36 September 25

आज बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले

मुंबई : 10 ग्रॅम पिवळ्या धातूचा (24-कॅरेट) भाव 530 रुपयांनी वाढून 50,730 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव मात्र 1,200 रुपयांनी घसरून 56,800 रुपये प्रति किलो झाला. दरम्यान, 22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 500 रुपयांच्या वाढीनंतर 46,500 रुपयांवर आहे. ( 25 Septembar 2022 Gold Silver Rates ) मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,730 रुपये ( Mumbai News of Gold Silver Rate ) प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 46,500 रुपये आहे. दिल्लीत 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 50,890 रुपये आणि 46,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

10:36 September 25

मुंबईची तहान भागवण्यासाठी मोठ्या प्रकल्पाऐवजी लहान प्रकल्पाला मंजुरी

मुंबई - सध्या मुंबईला पाणी पुरवठा ( Mumbai Water Supply ) करणाऱ्या सात धरणातून ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. भविष्यात मुंबईची तहान भागवण्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा सारख्या प्रकल्पांची आवश्यकता आहे. मात्र पालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) जास्त पाणी मिळेल असे प्रकल्प राबवण्याऐवजी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती ( Approval small water project ) घेतल्याचे समोर आले आहे. नव्या

08:20 September 25

आदित्य ठाकरे स्वतःच्या पायावर कुराड मारतायेत - मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे - वेदांता प्रकल्पावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तळेगाव येथे जन आक्रोश आंदोलन करत सत्ताधारी शिंदे सरकारवर टीका केली. याबाबत पुणे जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांनी वेदांता प्रकल्पाबाबत घटनाक्रम जाहीर करावा. त्यांनी आपल्या अहंकारापाई मुंबईची वाट लावली. ते जे आक्रोश यात्रा काढत आहेत ते स्वतःच्या पायावर कुऱहाड मारत आहेत. ते स्वतः हा हून सांगत आहेत की या आम्ही कसे प्रकल्प पळवले, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली.

08:19 September 25

अल्पवयीन मुलींच्या सहमतीला कायद्याच्या दृष्टीकोनातून कोणतेही स्थान नाही - मुंबई सत्र न्यायालय

मुंबई - अल्पवयीन 13 वर्षीय मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी कुर्ल्यातील नेहरू नगर येथील आरोपी सोनू करमाळीला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टाने आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीने दिलेल्या सहमतीला कायद्याच्या दृष्टीकोनातून कोणतेही स्थान नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आहे.

08:19 September 25

देवेंद्र फडणवीस अमरावतीचे नवे पालकमंत्री

अमरावती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली असून अमरावती जिल्ह्याचे पालकत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाले आहे.

08:19 September 25

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका देशात अव्वल

कराड नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात पुन्हा एकदा देशपातळीवर यश मिळवत पहिल्या पाच क्रमांकात बाजी मारली आहे. देशातील सव्वा लाख लोकसंख्येच्या गटात कराड पालिका अव्वल आली आहे. पाच नगरपालिकांना दि. १ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

06:57 September 25

नायर रुग्णालयात शिकणाऱ्या वैद्यकिय विद्यार्थिनीची राहत्या घरी आत्महत्या

मुंबई - नायर रुग्णालयात ऑक्युप्रेशर थेरपीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रेयसी पाटकर (२८) असे तिचे नाव होते. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसून याप्रकरणी आग्रीपाडा पोलिस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद केली आहे.

06:40 September 25

MAHARASHTRA BREAKING NEWS

रत्नागिरी - धोपेश्वर रिफायनरी संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक मोठ विधान केलं आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी आपण पाहिजे ते पॅकेज देऊ, स्थानिकांच्या शंका आम्ही नक्की दूर करू असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. निर्यात आणि एक जिल्हा एक उत्पादन, व्यवसाय करण्यास सुलभता, गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत बोलत होते. या परिषदेचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं.

Last Updated : Sep 25, 2022, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.